File photo  Saam Tv
मुंबई/पुणे

अखेर मुंबईत पावसाच्या सरी! मुंबईसह राज्यातील अनेक भागात पावसाची दमदार हजेरी

अंग भाजून उन्ह आणि उकाड्यामुळे हैराण झालेल्या राज्यातील नागरिकांना पहिल्या दमदार पावासाने दिलासा दिला आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : अंग भाजून उन्ह आणि उकाड्यामुळे हैराण झालेल्या राज्यातील नागरिकांना पहिल्या दमदार पावासाने दिलासा दिला आहे. मुंबई (Mumbai) पूर्व उपनगरासहित नवीमुंबई, पालघर , औरंगाबाद , अहमदनगरमध्ये दमदार पावसाच्या (Rain) सरी बरसल्या आहेत. अचानक पडलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. दरम्यान, जोरदार पावसामुळे पालघरमध्ये ग्रामीण भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे. (Mumbai Rain News In Marathi )

राज्यात उन्हाच्या उकाड्यामुळे हैराण आणि तापमानवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले होते. राज्यात काही भागात तापमानातील चढउतारामुळे उकाड्यातही वाढ झाली होती. मात्र, राज्यातल्या अनेक भागात पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. मुंबई पूर्व उपनगारातही सुरुवात झाली आहे. त्यात विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडुप, मुलुंड मध्ये पावसाची दमदार हजेरी लावली. या पावसाचा आनंद घेण्यासाठी बच्चेकंपनीने रस्त्यावर उतरून पावसाचा आनंद घेत फुटबॉल खेळायला सुरुवात केली आहे.

दरम्यान, मुंबई, नवी मुंबईसहित पालघर जिल्ह्यातील किनारपट्टीसह पूर्व भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पालघरच्या बोईसर , चिंचणी,मनोर, डहाणू,तलासरी , विक्रमगडसह इतर भागात विजांच्या गडगडाटासह दमदार पावसाच्या सरी बरसल्या आहेत. पहिल्या पावसाच्या आगमनाने हवेत गारवा, उकाड्या पासून पालघरवासियांना दिलासा मिळाला आहे. अचानक पडलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. तर ग्रामीण भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे. मात्र,या पावसामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

पहिल्या पावसात ट्रान्स हार्बर मार्ग विस्कळीत

गेले दोन महिने उन्हामुळे त्रस्त झालेल्या नवी मुंबईत पावसाच्या हजेरीने दिलासा मिळाला आहे. नवी मुंबईत जोरदार पावसाच्या सरी कोसळू लागल्या आहेत. मात्र, दुसरीकडे पहिला पाऊस कोसळताच वाशी ते सानपाडा स्टेशन दरम्यान रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे पहिल्या पावसाचा फटका ट्रान्स हार्बर मार्गाला बसला आहे.

Edited By - Vishal Gangurde

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे न्याय मिळत नसेल तर गुंडगिरी करू, ठाकरेंचा फडणवीसांना टोला

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Metro In Dino Cast Fees: रोमँटिक म्युझिकल ड्रामा 'मेट्रो इन डिनो' चित्रपटातील कलाकारांचे मानधन किती?

Marathi Bhasha Vijay Divas: 'एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी, आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार'; उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत

SCROLL FOR NEXT