Breaking : ओव्हरहेड वायर तुटल्याने ट्रान्स हार्बरची लोकल वाहतूक विस्कळीत

पहिला पाऊस कोसळताच वाशी ते सानपाडा स्टेशन दरम्यान रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे पहिल्या पावसाचा फटका ट्रान्स हार्बर मार्गाला बसला आहे.
Local train
Local train Saam Tv
Published On

नवी मुंबई : गेले दोन महिने उन्हामुळे त्रस्त झालेल्या नवी मुंबईत पावसाच्या हजेरीने दिलासा मिळाला आहे. नवी मुंबईत जोरदार पावसाच्या सरी कोसळू लागल्या आहेत. मात्र, दुसरीकडे पहिला पाऊस कोसळताच वाशी ते सानपाडा स्टेशन दरम्यान रेल्वे (Local Train) वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे पहिल्या पावसाचा (Rain) फटका ट्रान्स हार्बर मार्गाला बसला आहे. (Trans harbour Local train News In Marathi )

Local train
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! मुंबईत 'या' तारखांना असणार मेगाब्लॉक

दोन ते तीन महिन्यानंतर नवी मुंबईत जोरदार पाऊस बरसत आहे.अंग भाजून काढणाऱ्या उन्ह आणि उकाड्यामुळे हैराण झालेल्या नवी मुंबईकरांना गुरुवारी दिलासा मिळाला आहे.मात्र पहिल्या पावसाने ट्रान्स हार्बर मार्गावरील वाशी स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटली आहे. ट्रान्स हार्बर मार्गावरील वाशी-सानपाडा स्थानकांवर सायंकाळी 7 वाजता ही घटना घडली आहे. यामुळे वाशी ते सानपाडा स्टेशन दरम्यान रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. मात्र, ठाणे पनवेल ट्रान्सहार्बर रेल्वे सेवा सुरू आहे. तसेच रेल्वे कर्मचारी समस्या सोडवण्यासाठी काम करत असून आणखी काही काळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहिल्या पावसाचा फटका हा ट्रान्स हार्बर मार्गावरून प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना बसला आहे.

Local train
महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट; गेल्या २४ तासांत राज्यातील रुग्णसंख्येत मोठी वाढ

पालघर जिल्ह्यात बरसल्या पावसाच्या सरी

दरम्यान, नवी मुंबईसहित पालघर जिल्ह्यातील किनारपट्टीसह पूर्व भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पालघरच्या बोईसर , चिंचणी,मनोर, डहाणू,तलासरी , विक्रमगडसह इतर भागात विजांच्या गडगडाटासह दमदार पावसाच्या सरी बरसल्या आहेत. पहिल्या पावसाच्या आगमनाने हवेत गारवा, उकाड्या पासून पालघरवासियांना दिलासा मिळाला आहे. अचानक पडलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. तर ग्रामीण भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे. मात्र, या पावसामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com