Mumbai Mega Block  x
मुंबई/पुणे

Mega Block : मध्य-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, कसा कराल प्रवास? कोणत्या लोकल रद्द? वाचा वेळापत्रक

Mumbai Mega Block : रेल्वेची देखभालीची कामे करण्यासाठी २४ ऑगस्ट (रविवारी) मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक राहणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

Yash Shirke

  • २४ ऑगस्ट रोजी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक राहणार आहे, त्यामुळे अनेक लोकल गाड्या रद्द राहतील.

  • ठाणे-मुलुंड-माटुंगा मार्गावरील धीम्या गाड्या अप/डाउन जलद मार्गावर वळवल्या जातील आणि १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

  • ठाणे व वाशी/नेरुळ दरम्यान ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा सकाळी ११.१० ते संध्याकाळी १६.१० पर्यंत बंद राहणार आहे.

Mumbai News : रविवार २४ ऑगस्ट २०२५ रोजी रेल्वेची विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक असणार आहे. या दरम्यान मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गांवर प्रामुख्याने मेगा ब्लॉक असणार आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने मेगा ब्लॉकचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

माटुंगा- मुलुंड अप आणि डाउन धीम्या मार्गावर ११.०५ वाजेपासून १५.५५ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून १०.१४ ते १५.३२ पर्यंत सुटणाऱ्या डाउन धीम्या मार्गावरील गाड्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील आणि मुलुंड स्थानकावर डाउन धीम्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

ठाणे येथून सकाळी ११.०७ ते दुपारी ३.५१ या कालावधी दरम्यान सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील गाड्या मुलुंड येथे अप जलद मार्गावर जातील. या गाड्या मुलुंड ते माटुंगा दरम्यान मुलुंड, भांडूप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव या स्थानकांवर थांबतील. नंतर माटुंगा येथे गाड्या पुन्हा अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील. त्यामुळे या गाड्या निर्धारित वेळेपेक्षा सुमारे १५ मिनिटे उशिरा गंतव्यस्थानी पोहोचतील.

ठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांच्या दरम्यान अप व डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते संध्याकाळी १६.१० वाजेपर्यंत सेवा बंद राहील. ब्लॉक काळात अप व डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा बंद असेल. त्याचप्रमाणे, ठाणे येथून सकाळी १०.३५ ते दुपारी १६.०७ वाजेपर्यंत वाशी/नेरुळ/पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन मार्गावरील गाड्या आणि सकाळी १०.२५ ते दुपारी १६.०९ या दरम्यान पनवेल/नेरुळ/वाशी येथून ठाण्याकडे जाणाऱ्या अप मार्गावरील गाड्या रद्द राहतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राज ठाकरेंचा १९ ऑक्टोबर रोजी मेळावा

Diwali 2025: या 5 राशींची दिवाळी होणार धुम-धडाक्यात, माता लक्ष्मीची असणार विशेष कृपा

Shocking: इंदुरमध्ये सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न, २८ तृतीयपंथीयांनी प्यायले फिनाइल; नेमकं कारण काय?

Diwali Offer: १ रुपयात अनलिमिटेड कॉल अन् दररोज 2GBडेटा, दिवाळीची बंपर ऑफर

Actress Scandel: दिवाळी पार्टीमध्ये अभिनेत्रीचा सुटला ताबा; खुल्लम खुल्ला पतीसोबत केला लिप लॉक, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT