Pune Mumbai Shivneri Bus Soon To Run on Atal Setu Bridge, Know Route Timing Here Saam Tv
मुंबई/पुणे

Atal Setu Bridge: मुंबई-पुणे एसटी बस अटल सेतूवरुन धावणार; पण 'ही'आहे अट...

Bharat Jadhav

MSRTC Bus on Atal Setu Bridge:

मुंबई-पुणेदरम्यानच्या एसटी प्रवासाचा वेळ आता कमी होण्याची शक्यता आहे. कारण राज्य परिवहन महामंडळाकडून मुंबई ते पुणे मार्गावरील शिवनेरी बसेस शिवडी न्हावा-शेवा अटल सेतूवरून चालवाण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई-पुणे शिवनेरी बसेस अटल सेतूवरुन नेण्याच्या प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. (Latest News)

त्यादृष्टीने या मार्गावरील शिवनेरीचे नवे थांबे, टोलचा खर्च आणि या मार्गावरुन शिवनेरी चालवणे कितपत व्यवहार्य ठरेल, याविषयी विचार केला जातोय. या सगळ्या चर्चेअंती आता एसटी महामंडळाकडून मुंबई-पुणे शिवनेरी बस अटल सेतूवरुन प्रायोगिक तत्त्वावर चालवली जाऊ शकते, असं निश्चित झालंय. परंतु एसटी महामंडळाने यासाठी एक अट ठेवल्याचं सांगितलं जात आहे. शिवनेरी बस मुंबईतून सुटताना त्यामध्ये ४५ प्रवाशी असतील तर बस अटल सेतूवरुन नेण्यात येईल. मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ तब्बल १ तासाने कमी होऊ शकतो. सुरुवातीच्या टप्प्यात शिवनेरी बसच्या मुंबई-पुणे प्रत्येकी फेऱ्यांमागे एक फेरी अटल सेतूवरुन चालवण्याचे नियोजन केलं जाणार आहे.

कसा असेल मार्ग किती वेळ लागेल

दादर-शिवडी-अटल सेतू-उलवे-पनवेल-पुणे असा या शिवनेरी बसचा (Shivneri Bus) मार्ग असेल, अशी माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. शिवडी न्हावा-शेवा अटल सेतू सुरू झाल्यापासूनच मुंबई-पुणे शिवनेरी बस या मार्गावरुन चालवण्याच्या मागणीने जोर धरला होता. यामुळे मुंबईहून अवघ्या २० मिनिटांत सिग्नलमुक्त मार्गाने चिर्ले येथे पोहोचणे शक्य होणार आहे. चिर्लेहून ६० किमी अंतरावर मुंबई-पुणे (Mumbai-Pune) द्रुतगती मार्ग आहे. त्यादृष्टीने एसटी महामंडळाने या मार्गावरुन बस चालवण्याची चाचपणी सुरू केली होती.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अटल सेतूच्या (Atal-Setu Route) मार्गाने पुणे ते दादर हे अंतर कमी होते. वाशी, कळंबोली मार्गापेक्षा हे अंतर ५ किलोमीटरने कमी भरते. वाहतूक कोंडीची समस्येचा विचार केल्यास शिवनेरी बस अटल सेतूवरुन नेल्यास प्रवासाचा वेळेत एका तासाचा फरक पडणार आहे. मात्र मुंबईतून अटल सेतूवर प्रवेश केल्यास मुंबई-पुणेदरम्यान पनवेल एसटी स्थानकावर बसला जाता येणार नाहीये. पनवेलसह अन्य लहान-मोठे थांबेही घेता येणार नसल्याचं सांगितलं जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

SCROLL FOR NEXT