Mumbai Pune Railway News
Mumbai Pune Railway News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Pune News : मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर दरड कोसळली; रेल्वेची वाहतूक ठप्प

साम टिव्ही ब्युरो

पुणे : मुंबई-पुणे रेल्वे (Mumbai Pune) मार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई-पुणे रेल्वे (Railway) महामार्गावर दरड कोसळली आहे. घाटाच्या भागात ही दरड कोसळल्याची माहिती आहे. दरड कोसळल्याने वाहतूकीचा मोठा खोळंबा झाला असून रेल्वे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दरड कोसळ्याची माहिती मिळताच प्रशासनाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून दरड हटवण्याचे काम सुरु आहे. (Mumbai Pune Railway Latest News)

प्राप्त माहितीनुसार, लोणावळ्याजवळील मंकी हिलजवळ ही दरड कोसळली आहे. त्यामुळे सकाळी ६ वाजेपासून पुण्याहून मुंबईला निघालेल्या रेल्वे खंडाळ्याला थांबल्या असल्याची माहिती आहे. तर मुंबईहून पुण्याकडे निघालेल्या रेल्वे कर्जतजवळ थांबण्यात आल्या आहेत.

आज शुक्रवार असल्याने विकेंडमध्ये अनेक जण मुंबई ते पुणे रेल्वेने प्रवास करत असतात. मात्र, भल्यापहाटेच घाट परिसरात दरड कोसळ्याने वाहतूकीचा खोळंबा झाला आहे. दरड कोसळ्याची माहिती मिळताच प्रशासनाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून दरड हटवण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. (Mumbai Pune Train Latest News)

रेल्वे रुळावर पडलेला भलामोठा जेसीबीच्या सहाय्याने हटवण्याचं काम सुरू आहे. दरड कोसळ्यामुळे मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. दरम्यान, मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक नेमकी कधीपर्यंत सुरू होते हेच पाहणं महत्वाचं ठरणा आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shirur Loksabha Election: अमोल कोल्हे-आढळराव पाटील दोघेही एकमेकांच्या पडले पाया, पाहा व्हिडीओ

Mumbai Local Train: मोठी बातमी! CSMT स्थानकात शिरताना लोकल ट्रेनचा डबा घसरला; हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत

SSC Result HSC Result Date News: दहावी, बारावीचा निकाल कधी? मोठी Update समोर!

Onion Benefits: शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी बहुगुणी ठरेल कांदा

Indore Lok Sabha Constituency : इंदूरमध्ये 'सूरत'ची पुनरावृत्ती, काँग्रेसला मोठा झटका; उमेदवाराने अर्ज मागे घेतला

SCROLL FOR NEXT