Mumbai Pune Missing Link Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे प्रवास आणखी सुसाट! 'मिसिंग लिंक' या दिवशी सुरू होणार, महत्त्वाची अपडेट समोर

Mumbai Pune Missing Link Inaugaration Date: मुंबई-पुणे मिसिंग लिंकचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात आहे. लवकरच हे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर हा मिसिंग लिंक सर्वांसाठी खुला होणार आहे.

Siddhi Hande

मुंबई पुणे मिसिंग लिंकच काम अंतिम टप्प्यात

लवकरच होणार लोकार्पण

मुंबईहून पुण्याला जाण्यासाठीचा वेळ ३० मिनिटांनी होणार कमी

मुंबई पुणे मिसिंग लिंक लवकरच सुरु होणार आहे. मुंबई पुणे मिसिंग लिंक सुरु होण्याची अनेक वाहनधारक आतुरतेने वाट पाहत आहे. या मिसिंग लिंकमुळे मुंबई-पुण्यातील अंतर अजूनच कमी होणार आहे. हा मिसिंग लिंक डिसेंबर महिन्यात सुरु होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले होते. मात्र, आता याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

मिसिंग लिंक कसा असणार? (Mumbai Pune Missing Link)

मुंबई पुण्याला जोडणारा मिसिंग लिंक हा १३.३ किलोमीटर लांब असणार आहे. हा मिसिंग लिंक आठपदरी असणार आहे. हा मिसिंग लिंक लोणावळा-खंडाळा घाट मार्गाला पर्याय असणार आहे. यामुळे तुम्हाला घाटातील वाहतूक कोंडीतून प्रवास करावा लागणार नाही. या मिसिंग लिंकमुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील अंतर ६ किलोमीटरने कमी होणार आहे. त्यामुळे जवळपास ३० मिनिटांचा वेळ वाटणार आहे.

उद्घाटन कधी होणार? (Mumbai Pune Missing Link Inaugartion Date)

राज्य सरकारच्या हा मिसिंग लिंक डिसेंबर महिन्यात सुरु होणार असल्याचे सांगितले होते. मात्र,आता हे लोकार्पण लांबणीवर जाऊ शकते. राज्य विधीमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीच्या पाहणी दौरा झाला. प्रकल्प जरी पूर्ण होण्याच्या मार्गावर असला तरीही डिसेंबरमध्ये लोकार्पण करण्याची मुदत हुकणार, असा दावा भिवंडीचे पूर्व आमदार रईस शेख यांनी केला आहे.

या मार्गात खोपोली एक्झिटपासून ते लोणावळ्यापर्यंत दोन्ही दिशेने दोन बोगदे आहेत. एक बोगदा ९ किलोमीटर तर दुसरा २ किमीचा आहे. या बोगद्यामुळे प्रवास खूप सुसाट होणार आहे. वेळ वाचणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli Crime : बनावट आयकर अधिकाऱ्यांकडून दरोडा; डॉक्टरांच्या घरातून कोट्यवधींचे सोने व रोकड लांबविली

Maharashtra Live News Update: देवव्रत यांनी घेतली महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून शपथ

Bhandara Rain : ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, भंडाऱ्यात मुसळधार पाऊस |VIDEO

Pune News : एकीकडे धो धो पाऊस, दुसरीकडे तारामधून ठिणग्या अन् जाळ; मावळमध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Heavy Rain : संभाजीनगर जिल्ह्यात पावसाचा हाहाकार; दोन दिवसात १० मंडळामध्ये अतिवृष्टी, शेतातील कांदा गेला वाहून

SCROLL FOR NEXT