Mumbai-Pune Greenfield Expressway AI Image
मुंबई/पुणे

Mumbai Pune : मुंबई-पुणे प्रवास अवघ्या 90 मिनिटांत! नवीन ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवेची तयारी सुरू; बेंगळुरू गाठणेही होणार सोपे

Mumbai Pune Greenfield Expressway News : मुंबई-पुणे प्रवास अवघ्या ९० मिनिटांत करण्यासाठी १३० किलोमीटरचा नवीन आठ पदरी ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे उभारण्यात येणार आहे. १५ हजार कोटींचा हा प्रकल्प आहे.

Alisha Khedekar

  • मुंबई-पुणे प्रवास अवघ्या 90 मिनिटांत !

  • नवीन ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे आठ पदरी असणार

  • संपूर्ण प्रकल्पासाठी अंदाजे १५,००० कोटी रुपयांचा खर्च

मुंबई आणि पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. या दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी नवीन ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे उभारण्यात येणार आहे. हा महामार्ग तयार झाल्यानंतर मुंबई ते पुणे हे अंतर अवघ्या ९० मिनिटांत पार करता येणार आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पामुळे बेंगळुरूपर्यंत पोहोचणेही अधिक सोयीचे होण्याची शक्यता आहे.

नवीन एक्सप्रेसवेची लांबी सुमारे १३० किलोमीटर असणार असून तो आठ पदरी असेल. हा मार्ग सध्याच्या मुंबई-पुणे एक्सप्रेसवेला समांतर तयार केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे १५ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. महामार्गावर दररोज सुमारे तीन लाख वाहनांची वाहतूक हाताळण्याची क्षमता असेल. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल मागवला आहे. तसेच निविदा उघडण्याची तारीख आता २७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यानंतर प्रकल्पाच्या पुढील कामाला गती मिळण्याची अपेक्षा आहे.

या महामार्गाचे काम दोन टप्प्यांत केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात पागोटे ते चौकदरम्यान सुमारे ३० किलोमीटरचा रस्ता बांधला जाईल. यासाठी अंदाजे ४,५०० कोटी रुपये खर्च होणार असून सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये दोन बोगदेही तयार केले जाणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात सुमारे १०० किलोमीटरचा मार्ग उभारला जाणार आहे. या भागासाठी सध्या डीपीआर आणि अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या प्रकल्पाचा फायदा केवळ मुंबई आणि पुणेकरांनाच नाही, तर बेंगळुरूला जाणाऱ्या प्रवाशांनाही होणार आहे. नवीन रस्त्यांमुळे मुंबई, पुणे आणि बेंगळुरू यांच्यातील जोडणी अधिक मजबूत होईल. पुणे ते बेंगळुरू प्रवासाचा वेळ सध्याच्या तुलनेत कमी होण्याची अपेक्षा आहे. नवीन मार्गामुळे वाहनांना पुणे शहरातील गर्दीत न अडकता बाहेरील मार्गावरून पुढे जाता येईल. त्यामुळे वाहतूक कोंडी, सिग्नल आणि प्रवासातील विलंब कमी होण्यास मदत होईल. एकूणच, हा महामार्ग पूर्ण झाल्यास महाराष्ट्र आणि कर्नाटकातील प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईत उघड्यावर शेकोटी पेटवल्यास २ हजार दंड

Tamhini Ghat Accident : ताम्हिणी घाटात भयंकर अपघात, कार दरीत कोसळून व्यावसायिकाचा मृत्यू

High Blood Pressure: High BPचा त्रास सतावतोय? सकाळी-सकाळी प्या फक्त हे 1 ड्रिंक; डॉक्टरांनी सांगितलं झटक्यात रक्तदाब होईल कमी

Maharashtra Weather : महाराष्ट्राचा पारा घसरला, थंडी वाढली; पण विदर्भात पावसाची शक्यता, पाहा कसं असेल आजचं तापमान

Thane Forts : हिवाळ्यात ट्रेकिंगचा आनंद घ्यायचाय? वन डे ट्रिपसाठी ठाणे जिल्ह्यातील 'हे' ७ किल्ले बेस्ट

SCROLL FOR NEXT