Mumbai - Pune Expressway Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai - Pune Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ट्रॅफिक जाम; वाहनांच्या लांबच लांब रांगा, प्रवाशांचा खोळंबा

Mumbai - Pune Expressway Traffic Jam: मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. अशातच येथे एक छोटासा अपघात देखील घडला आहे.

Ruchika Jadhav

Mumbai - Pune Expressway News:

मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर ट्रॅफिक जाम झाल्याची माहिती समोर आली आहे. वीकएंड असल्यानं मोठ्या संख्येने मुंबईकर घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी निर्माण झाली आहे. (Latest Marathi News)

सुट्टीमुळे नागरिक घराबाहेर पडलेत. मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. अशातच येथे एक छोटासा अपघात देखील घडला आहे. यामुळं बोरघाटात वाहतूक कासवगतीने सुरुये. पुढील काही काळ अशीच परिस्थिती राहण्याची चिन्ह आहेत. पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. तळेगाव टोल नाका ते लोणावळापर्यंत वाहतूक कोंडी आहे. लोणावळा घाटातही वाहनांच्या लांब रांगा लागल्यात

पुणे-मुंबई द्रुतगतीमार्ग मंदावला आहे. वाहतूक सुरळीत होण्यासाठी दोन ते तीन तासांचा वेळ लागण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्याभरात मुंबईत पावसाने विश्रांती घेतली होती. अशात गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावल्याने पर्यटक घराबाहेर पडलेत.

शनिवार-रविवार लागून सुट्टी असल्याने कुटुंबीय, मित्रमंडळी घराबाहेर पडले आहेत. मात्र बाहेर फिरायला जाण्यासाठीच्या त्यांच्या आनंदात वाहतूक कोंडी मिठाचा खडा पडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; ३५ लाखांची सुपारी देऊन हत्येचा कट रचल्याचा आरोप

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर कमी झाला तरी पगार वाढणार? २.१ च्या फॉर्मुल्याचे गणित समजून घ्या

Congress Protest Live Update : दिल्लीत भाजप महिला मोर्चाचं काँग्रेसविरोधात आंदोलन, पाहा व्हिडीओ

Skin Care: चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी लावा बटाट्याचा रस; मिळेल ग्लोईंग स्मूद स्किन

Amba Haldi Benefits Foot Sprain : पाय मुरगळल्यावर ताबडतोब आंबेहळदीचा सोपा उपाय करा; सूज आणि वेदना होईल कमी

SCROLL FOR NEXT