Mumbai Traffic Jam on Western Expressway : मुंबईकरांची आठवड्याची सुरुवात वाहतूक कोडींने, पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या रांगा

Mumbai Traffic Jam on Western Expressway : मुंबईकरांची आठवड्याची सुरुवात वाहतूक कोडींने, पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या रांगा

Andheri Traffic Jam : अंधेरीजवळील पश्चिम द्रुतगती महामार्गावर सोमवारी सकाळी प्रचंड वाहतूक कोंडी दिसून आली.
Published on

संजय गडदे

Mumbai News : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना मोठ्या वाहतूक कोडींचा सामना करावा लागत आहे. अंधेरीजवळील पश्चिम द्रुतगती महामार्गावर सोमवारी सकाळी प्रचंड वाहतूक कोंडी दिसून आली. (Mumbai News)

अंधेरी उड्डाणपुलावर असलेल्या गॅन्ट्री गर्डर पाडण्याचे काम मध्यरात्रीपासून सुरू होते. त्यामुळे उड्डाणपूल बंद ठेवण्यात आल्याने पुलाखालील वाहतूक ठप्प झाली होती. वाहतूक पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अधिसूचना जारी केली होती की 14 ऑगस्टच्या मध्यरात्री 12 ते 6 दरम्यान उड्डाणपूल कामामुळे वाहतुकीसाठी बंद असेल.  (Latest Marathi News)

Mumbai Traffic Jam on Western Expressway : मुंबईकरांची आठवड्याची सुरुवात वाहतूक कोडींने, पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या रांगा
Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, चालकाला डुलकी लागल्याने कार पलटी, कारचा अक्षरश: चक्काचूर

मात्र काम उशिरापर्यंत सुरू असल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. सोमवार असल्याने बहुतांश मुंबईकर बोरिवली येथून मुंबईकडे कार्यालयात जाण्यासाठी निघाल्याने रस्त्यावरील वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. तासभर हे काम चालणार असून लवकरच हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com