Mumbai-Pune Expressway Traffic: Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai-Pune Expressway Traffic: मुंबई-पुणे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी; गणेशोत्सवासाठी निघालेले चाकरमानी रस्त्यातच

Mumbai-Pune Expressway Traffic: तिसऱ्या दिवशीही मुंबई-गोवा महामार्गावरील उर्से टोल नाक्यावर वाहनांच्या चार किलोमीटरच्या रांगाच रांगा पाहायला मिळत आहे.

Vishal Gangurde

दिलीप कांबळे

Mumbai-Pune Expressway Traffic Updates:

गणेशोत्सवासाठी चाकरमानी गावाकडे जाण्यासाठी निघाले आहेत. यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची रांगा दिसू लागल्या आहेत. तिसऱ्या दिवशीही मुंबई-गोवा महामार्गावरील उर्से टोल नाक्यावर वाहनांच्या चार किलोमीटरच्या रांगाच रांगा पाहायला मिळत आहे. यामुळे मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. (Latest Marathi News)

गणेशोत्सव अगदी एका दिवसावर येऊन ठेपला आहे. गणेशोतस्व साजरा करण्यासाठी अनेकांनी गावाची वाट धरली आहे. मुंबई आणि उपनगरातील अनेक नागरिक पुण्याच्या दिशेने निघाले आहेत. मात्र, प्रशासनाच्या वतीने वारंवार विनंती करूनही नागरिक ऐकायला तयार नाहीत. अनेक जण खासगी वाहनाने पुण्याच्या दिशेने निघाले आहेत.

मुंबई-पुणे महामार्गावरील उर्से टोल नाक्यावर वाहनांच्या चार किलोमीटरच्या रांगाच रांगा लागल्याचे चित्र बघायला मिळत आहे. मुंबईहून पुण्याच्या दिशेने हे वाहने जाता आहे. त्यामुळे उर्से टोलनाक्यावर मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम झाल्याच चित्र दिसत आहे.

दरम्यान, वाहतूक कोंडीमुळे आनंदात निघालेल्या चाकरमान्यांना प्रवासात त्रास सहन करावा लागत आहे. मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक अधिक जलद आणि सुरक्षित करण्यासाठी हा मार्गा आठपदरी करण्याची प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे. शासनाने हा प्रशासनाने मंजूर केल्यास मुंबई-पुणे महामार्गावर आठपदरी होण्याची शक्यता आहे.

मुंबई पुणे महामार्गावरील बोरघाटातही वाहतूक कोंडी

पुणे-मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अनेक चाकरमानी मुंबईकर मोठ्या संख्येनं बाहेर पडले आहेत. परिणामी या मार्गावर याचा ताण आला आहे. वाहनांच्या वाढलेल्या संख्येनं बोरघाटात मार्ग मंदावला आहे.

अमृतांजन पुलाजवळ वाहनं कासवगतीने पुढं सरकत आहेत. कोणाला पर्यटनस्थळी तर कोणाला तर आपापल्या गावाला गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पोहचायचं आहे, पण तत्पूर्वी या वाहतूक कोंडीचा सामना करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sai Tamhankar: लालछडी...! सईचा हटके अंदाज, Photo पाहतच राहाल

Actress Vannu The Great : लग्नासाठी धर्मांतर केलं, नवरा संसार अर्ध्यात सोडून पळाला; अभिनेत्री रडून रडून बेहाल

Crime News : जमिनीच्या वादातून अपहरण करत हत्या; शहापूर तालुक्यातील घटनेने खळबळ

Prajakta Koli: सोशल मिडीया स्टार प्राजक्ता कोळीची मराठीत एन्ट्री; 'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम'मध्ये साकारणार खास भूमिका

Maharashtra Live News Update: सरकारने काढलेला जीआर वादग्रस्त - छगन भुजबळ

SCROLL FOR NEXT