मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचे रुंदीकरण होणार; शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात दिलीप कांबळे
मुंबई/पुणे

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचे रुंदीकरण होणार; शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचे रुंदीकरण होणार असून या मार्गाच्या दोन्ही बाजूला ३०-३० मीटर रस्ता वाढवण्यात येणार आहे त्यामुळे मावळ मधील शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

दिलीप कांबळे

मावळ: मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगतीमार्ग हा दोन हजार साली तयार करण्यात आला होता. त्यावेळी मावळातील असंख्य शेतकऱ्यांच्या जमिनी या द्रुतगती मार्गासाठी संपादित करण्यात आल्या होत्या. इंद्रायणी भारताचं आगार म्हणून ओळखले जाणारे मावळात मोठ्या प्रमाणात पीक घेण्यात येते आणि पीक देणाऱ्या जमिनी त्यावेळी सरकारने घेतलेल्या.

हे देखील पहा -

आतापर्यंत चार वेळा मावळातील शेतकऱ्यांच्या जमिनी विकास कामासाठी घेण्यात आल्या आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, बंद पाईप लाईन, हायपर लूक, आणि पवना धरण. विकासाला आमचा विरोध नाही, मात्र सरकारने आमचाही थोडाफार विचार करावा. दरम्यान आता मुंबई -पुणे द्रुतगती मार्गाच्या दोन्ही बाजूला तीस-तीस मीटर जमीन संपादित करून महामार्गाचे रुंदीकरण करणार आहे. द्रुतगती मार्गाच्या लागत असलेल्या जमिनी सोबत शेकडो घरे, मंदिर, गाईचे गोठेही जाणार आहे. अगोदरच चार वेळा आमच्या जमिनी पीएमआरडीने घेतल्या आहेत. आता सर्विस लाईनसाठी जर आमची जमीन घेतली तर आमच्याकडे जमीनच राहणार नाही, आम्ही भूमिहीन होऊ आणि आमच्यावर उपासमारीची वेळ येईल.

त्यामुळे सरकारने द्रुतगती मार्गाचे रुंदीकरण त्वरित थांबवावे नाहीतर, आम्हाला आंदोलन करावे लागेल. आमचेच भूमिपुत्र खासदार आमदार आमचे नेतृत्व करतात मात्र शेतकऱ्यांची बाजू मांडण्यास त्यांना वेळ नाही. अशी व्यथा मावळातील शेतकऱ्यांनी साम टीव्हीशी बोलताना व्यक्त केली.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT