MUMBAI PUNE EXPRESSWAY MISSING LINK SELFIE BAN SAFETY RULES AND FINES Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर 'नो क्लिक', सेल्फी-फोटो काढणं महागात पडणार, थांबलात तर गुन्हा दाखल होणार

Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर सेल्फी-फोटो काढणं महागात पडणार. गाडी घेऊन थांबलात तर गुन्हा दाखल करून दंड होणार. पोलिसांकडून कारवाईला सुरुवात

Alisha Khedekar

  • ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पामुळे प्रवास अधिक वेगवान आणि आकर्षक झाला आहे

  • केबल ब्रिज आणि बोगद्यांजवळ सेल्फी काढण्याचा मोह आवरा

  • वाहन थांबवल्यास अपघाताचा मोठा धोका

  • नियमभंग करणाऱ्यांवर दंड आणि कडक कारवाई

संजय गडदे, मुंबई

पुण्याला जाताना मिसिंग लिंकवर सेल्फी काढताय? त्याआधी ही बातमी वाचाच. मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प सुरू झाल्यानंतर प्रवाशांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत आहे. आकर्षक केबल स्टेड ब्रिज, बोगदे आणि निसर्गरम्य दृश्यांमुळे हा मार्ग सध्या चर्चेत आहे. मात्र, प्रवासादरम्यान अनेक वाहनचालक केबल ब्रिज व बोगद्याजवळ गाड्या थांबवून सेल्फी, फोटो आणि रिल्स काढताना दिसत आहेत. यामुळे अपघाताचा धोका वाढत असल्याने प्रशासनाने याबाबत गंभीर इशारा दिला असून नियमभंग करणाऱ्या नागरिकांवर दंड आकारला जाणार आहे.

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ‘यशवंतराव चव्हाण मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंक’चे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. हा प्रकल्प वाहतुकीसाठी खुला होताच काहीजण नियमांकडे दुर्लक्ष करत वाहन थांबवून फोटो काढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

महामार्ग पोलिसांनी या मार्गासाठी वेगमर्यादा निश्चित केली आहे. बोगद्यामध्ये हलक्या वाहनांसाठी ताशी १०० किमी, तर बस आणि इतर प्रवासी वाहनांसाठी ताशी ८० किमी वेग मर्यादा लागू करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण प्रकल्पावर २४x७ सीसीटीव्ही यंत्रणेची नजर असून, स्वतंत्र नियंत्रण कक्षाद्वारे सतत देखरेख केली जात आहे. द्रुतगती मार्गावर थांबणाऱ्या वाहनांची माहिती तात्काळ महामार्ग पोलिसांना दिली जात आहे. दरम्यान, केबल ब्रिज आणि परिसरातील निसर्गरम्य दृश्यांमुळे प्रवाशांना आकर्षण वाटत असले तरी अशा ठिकाणी वाहन थांबवणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी महामार्ग पोलिसांनी कारवाईचे सत्र सुरू केले आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने वाहनचालकांना आवाहन केले आहे की, द्रुतगती मार्गावर सेल्फी किंवा फोटो काढण्यासाठी वाहन थांबवू नये. असे केल्यास केवळ दंडच नव्हे तर स्वतःच्या आणि इतरांच्या जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो. सुरक्षित आणि नियमबद्ध प्रवासासाठी सर्वांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BREAKING: गदारोळानंतर केंद्र सरकारची मोठी कारवाई! शिक्षण विभागातील IAS अधिकाऱ्याची हकालपट्टी, नवीन अधिकाऱ्याचीही नियुक्ती

Maharashtra News Live Update: कॉकरोच जनता पार्टीचा आज पुण्यात मोर्चा

Masala Dosa Recipe: नाश्त्यासाठी घरीच बनवा हॉटेलस्टाईल कुरकुरीत मसाला डोसा, वाचा सोपी रेसिपी

Salt comparison: काळं मीठ आणि सैंधव मीठ यांच्यात काय फरक आहे?

Rain Alert : राज्यात मुसळधार पाऊस, पुण्यासह २० जिल्ह्यांना अलर्ट जारी; वाचा तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT