Mumbai-Pune Expresss Way Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai-Pune Expresss Way: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर सलग दुसऱ्या दिवशी ट्रॅफिक जाम, ७ ते ८ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा; पाहा VIDEO

Mumbai-Pune Expresss Way Traffic Jam: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. सलग सुट्ट्या आल्यामुळे ही वाहतूक कोंडी झाली आहे. खंडाळा घाटात वाहनांच्या ७ ते ८ किमीपर्यंत रांगा लागल्या आहेत.

Priya More

Summary -

  • सलग दुसऱ्या दिवशी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी

  • ७ ते ८ किमीपर्यंत वाहनांच्या लांब रांगा

  • सुट्ट्यांमुळे पर्यटकांची संख्या वाढल्याने परिणाम

  • महामार्ग पोलिसांकडून वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न सुरू

दिलीप कांबळे/ सचिन कदम, साम टीव्ही

मुंबई-पुणे एक्स्प्रेस सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. एक्स्प्रेस वेवर पुण्याच्या दिशेला जाणाऱ्या मार्गिकेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. प्रजासत्ताक दिनामुळे ३ दिवस सुट्ट्या आल्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबईमधील नागरिक फिरण्यासाठी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडले आहे. त्यामुळे मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी झाली आहे. पुण्याकडे जाणाऱ्या वाहनामुळे खालापूर तालुक्यातील पालीफाटा येथून खोपोली हद्दीतील अमृतांजन पुलापर्यंत ७ ते ८ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहे.

महामार्ग वाहतूक पोलिस, आयआरबी यंत्रणा, डेल्टा फोर्स वाहतूक नियंत्रित करण्याच्या प्रयत्न करीत असून वाहने मोठया प्रमाणात रस्त्यावर आल्याने वाहतूककोंडी होत आहे. वाहनं एकाच ठिकाणी बराच काळ अडकून राहिल्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर आज दुसऱ्या दिवशीही वाहनांच्या रांगा आणि धिम्या गतीने वाहतूक पाहायला मिळत असल्याने मुंबईतून घरा बाहेर पडताना काळजी घ्यावी किंवा अन्य पर्यायी मार्गाने प्रवास करता येणे शक्य आल्यास करावे अन्यथा वाहतूक कोंडीमध्ये अडकण्याची शक्यता आहे.

आज रविवार आणि उद्या २६ जानेवारी या आलेल्या सुट्ट्यांमुळे नागरिक आपल्या खासगी वाहनाने घराबाहेर पडून पर्यटन स्थळी सुट्टी घालवण्यासाठी जात आहेत. त्यामुळे पर्यटक आणि प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून त्याचा थेट परिणाम एक्स्प्रेस वेवरील वाहतुकीवर झाला आहे. त्यातच काही अवजड वाहनांनी लेन शिस्त न पाळता वाहने चालवल्यामुळे वाहतूक कोंडी अधिकच तीव्र झाली आहे.

मुंबई -पुणे एक्सप्रेस वेवरील आमृतांजन पूल ते खोपोली एक्झिटदरम्यान ही मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागली आहे त्यामुळे घाटात प्रवाशांचा जास्त वेळ जात आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महामार्ग पोलिसांकडून दर १५ मिनिटांनी वाहतूक ब्लॉक घेऊन हळूहळू वाहने पुढे सोडत आहेत. मात्र वाढलेल्या वाहनसंख्येमुळे वाहतूक पूर्वपदावर येण्यासाठी अधिकचा वेळ लागण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

त्याने आमचं ऐकलं नाही; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर 'अनिल' नावाची पोस्ट व्हायरल

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये! टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी पोलिस आयुक्तांना फोन

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

मोठी बातमी! अभिनेता टायगर श्रॉफवर अज्ञातांकडून गोळीबार

SCROLL FOR NEXT