mumbai pune express highway  Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी

उद्या दुपारी 12 ते 2 या वेळेत वाहतूक बंद राहिल

दिलीप कांबळे

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. उद्या म्हणजेच शुक्रवारी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक काही वेळेसाठी बंद राहणार आहे. MSRDC कडून किवळे गावाजवळ मुंबई दिशेने ओव्हर हेड गॅन्ट्री उभारण्याचे काम शुक्रवारी करण्यात येणार आहे. त्यामुळे दुपारी 12 ते 2 या वेळेत वाहतूक बंद राहिल, अशी माहिती एमएसआरडीसीकडून देण्यात आली आहे.

एमएसआरडीसीकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक किवावळे ते सामाटणे फाट्यादरम्यान बंद असणार आहे. दोन तास ही वाहतूक बंद राहणार असल्याने वाहतूक किवळे ते देहू रोड मार्ग, राष्ट्रीय महामार्ग ४८ वरून तसेच सोमाटणे फाटा ते द्रुतगती मार्गावरील तळेगाव पथकर नाका मार्गे वळवण्यात येणार आहे. (Mumbai Pune Expressway News)

या ट्राफिक ब्लॉक दरम्यान वाहनचालकांनी द्रुतगती पर्यायी मार्गाचा वापर करावा. असं आवाहन एमएसआरडीसीकडून करण्यात आलं आहे. वाहनचालकांना काही अडचण असल्यास त्यांनी मदतीसाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाच्या ९८२२४९८२२४ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही एमएसआरडीसीने केले आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध क्रिकेटपटूची राजकारणात एण्ट्री; हाती घेतलं कमळ,भाजपमध्ये सामील होताच मिळाली मोठी जबाबदारी

Pune News : पुण्यात भाजपला धक्का! बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश, राजकारणात मोठी घडामोड

फालतू भानगडी करताय! भाजपला संपवायला निघाले का? सुधीर मुनगंटीवारांची ऑडिओ क्लिप व्हायरल

Weather Update: ११ राज्यांवर पावसाचं संकट! वादळी वारे अन् विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा

मुंबईत तरुण-तरुणीला बेदम मारहाण; अल्पवयीन गार्डन गँगचा धुडगूस

SCROLL FOR NEXT