Mumbai-Pune Expressway Missing Link Tunnel Accident Saam TV marathi
मुंबई/पुणे

Mumbai Pune Expressway Accident: मिसिंग लिंकच्या बोगद्यात मध्यरात्री भीषण अपघात, पुण्यातील युवा नेत्याचा जागीच मृत्यू

Mumbai-Pune Expressway Missing Link Tunnel Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक बोगद्यात मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात वाकड येथील युवा नेते तुषार भूमकर यांचा जागीच मृत्यू झाला. फॉर्च्युनर कारने मालवाहू टेम्पोला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला.

Namdeo Kumbhar

Mumbai Pune Expressway Accident death : मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवेवरील 'मिसिंग लिंक' (कनेक्टिंग लिंक) बोगद्यात मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास एक अतिशय भीषण अपघात घडला. या दुर्दैवी अपघातात पिंपरी-चिंचवडमधील वाकड येथील युवा नेते तुषार भूमकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तुषार भूमकर हे पुण्यावरून मुंबईच्या दिशेने आपल्या फॉर्च्युनर कारने जात होते. दरम्यान, मिसिंग लिंकच्या बोगद्यात त्यांची कार समोर चाललेल्या एका मालवाहू टेम्पोला पाठीमागून अत्यंत जोरात धडकली. ही धडक एवढी भीषण होती की, तुषार भूमकर यांचा जागीच प्राणांत झाला.

या अपघातात कारमधील ३-४ जण जखमी झाले आहेत. त्यामधील एका व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याचे समजतेय. त्याला तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने कारमधील इतर तिघे जण या भीषण अपघातातून सुरक्षित बचावले आहेत. त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातानंतर मिसिंग लिंकच्या बोगद्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर तातडीने धाव घेतली आहे. पोलिसांनी अपघातग्रस्त कार तात्काळ बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. पोलिसांनी जखमींना तातडीची मदत केली. एका जखमीला त्यांनी तातडीने जवळच्या रूग्णलायात उपचारासाठी दाखल केले. तर तुषार भूमकर यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी जवळच्या सरकारी रूग्णलयात पाठवला आहे. पोलिसांनी या अपघाताची नोंद केली आहे.

तुषार भूमकर हे परिसरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय होते. त्यांच्या पत्नीने काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर महापालिका निवडणूक लढवली होती. त्यांच्या अशा अचानक आणि अकाली जाण्यामुळे वाकड परिसरासह संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात शोककळा पसरली असून, विविध स्तरातून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मालेगावात चोरांचा धुमाकूळ; चार घरांना केले लक्ष्य.

रायगडला मिळणार नवा पालकमंत्री! आमदाराच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ, 'या' नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब?

Rain Alert : राज्यात धो धो पाऊस कोसळणार, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा; जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज

मोठी बातमी! भाजपच्या बड्या नेत्याला मध्यरात्री अटक, महाराष्ट्रात राजकीय खळबळ

Bhandara Bandh : मोठी बातमी! आज 'भंडारा बंद'ची हाक; नेमकं कारण काय? पाहा काय उघडं अन् काय बंद राहणार

SCROLL FOR NEXT