Mumbai-Pune Expressway Accident Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai-Pune Expressway Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर विचित्र अपघात; कंटेनरने ६ वाहनांना चिरडलं

Mumbai-Pune Expressway Accdeint News: पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या कंटेनरचे ब्रेक निकामी झाल्याने पुढे असलेल्या सहा कारवर धडक बसली आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन कदम

Accident News: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर (Mumbai-Pune Expressway) भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. खोपोली हद्दीत मध्यरात्री मल्टी व्हेइकल्सचा अपघात झाला आहे. पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या कंटेनरचे ब्रेक निकामी झाल्याने पुढे असलेल्या सहा कारवर धडक बसली आहे. या अपघातामध्ये १ जण ठार झाल्याचे समजले आहे. (Latest Accident News)

भीषण अपघातामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लगल्या आहेत. अशात जखमी व्यक्तींसाठी बचावकार्य सुरु झाले आहे. तसेच त्यांना MGM रुग्णालयात हालवण्यात आले आहे.

नागपूर-पुणे महामार्गावर एसटी आणि ट्रक भीषण अपघात

सिंदखेडराजा तालुक्यातील पळसखेड चक्का या गावानजिक ट्रकने समोरून येणाऱ्या एसटीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात एकूण मृतकांची संख्या 8 झाली असून 13 प्रवाशी गंभीररीत्या जखमी झाले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, ही बस संभाजीनगरहून वाशिमच्या (Washim) दिशेने जात होती. त्याचवेळी सकाळी 6च्या दरम्यान ट्रक आणि बसची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आहे तर 13 प्रवाशी गंभीररीत्या जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढणायची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Accident News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये पावसाची हजेरी

Parbhani Hanuman Temple: परभणीत मोठी दुर्घटना; हनुमान मंदिराचा सभा मंडप कोसळला, 7 जणांचा मृत्यू, 32 भाविक जखमी

Chanakya Niti : खोटं व्हायला शिका नाहीतर दुनिया देईल धोका, चाणक्यांनी सांगितली ५ गंभीर गुपितं

Face Care: रोजच्या प्रवासामुळे चेहरा पूर्ण डल झालाय? मग आठवड्यातून २ वेळा लावा ही घरी तयार केलेली पेस्ट

Mouni Roy: मौनी रॉयचा साडीमध्ये ग्लॅमरस अंदाज; कर्व्ही फिगर फ्लाँट करत शेअर केले भन्नाट फोटो

SCROLL FOR NEXT