Mumbai-pune Expressway Accident Mumbai-pune Expressway Accident
मुंबई/पुणे

Khopoli Accident : भल्या पहाटे पुणे-मुंबई महामार्गावर अपघात, खासगी बस ट्रकला धडकली, ८ जणांची प्रकृती चिंताजनक

Mumbai-pune Expressway Accident News : पहाटे चार वाजता मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झालाय.

Namdeo Kumbhar

सचिन कदम, साम टीव्ही प्रतिनिधी

Mumbai-pune Expressway Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. भल्या पहाटे एक्स्प्रेस वेवर अपघात झाल्याचं समजतेय. कोल्हापूरवरुन मुंबईकडे येणाऱ्या खासगी बसचा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. यामद्ये १५ प्रवाशी जखमी झाले आहेत. यामधील ८ जणांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचे समजतेय. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. खोपोलीजवळ पहाटे चार वाजता अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य केलेय. (Khopoli Accident)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर पहाटे ४ वाजता एका खासगी बसचा भीषण अपघात झाला. खोपोलीजवळ पहाटे चार वाजताच्या (Raigad Khopoli Private bus accident) सुमारास अपघाताची घटना घडली. या अपघातामध्ये १५ जण जखमी झाले आहेत. जखमीमधील आठ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. सर्व जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. गंभीर जखमी असलेल्या प्रवाशांना उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे डॉक्टरांनी त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरु केले आहेत.

कोल्हापूरवरुन मुंबईकडे येणाऱ्या खासगी बसचा खोपोलीजवळ अपघात झाला. पहाटे चार वाजताच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस उभ्या असलेल्या ट्रकला जोरदर धडकली. या भीषण अपघातामध्ये १५ प्रवाशी जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच बोरघाट पोलीस, खोपोली पोलीस, आयआरबी यंत्रणा, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी गृप , देवदूत यंत्रणा , वाहतूक पोलीस अपघात ठिकाणी दाखल झाले. तात्काळ बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. जखमी प्रवाशांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. गंभीर जखमी असलेल्या प्रवाशांना मुंबईतील रुग्णालयात शिफ्ट कऱण्यात आले आहे. अपघात झाल्यानंतर खोपोलीत वाहतूककोंडी झाली होती. दोन्ही वाहने बाजूला गेल्यानंतर सध्या वाहतूक सुरळीत सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

SCROLL FOR NEXT