Mumbai-Pune Expressway Khopoli accident news Saam TV Marathi
मुंबई/पुणे

Mumbai-Pune Expressway Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेसवर भयंकर अपघात, ५ गाड्या एकमेकांवर आदळल्या, ३ जणांचा जागीच मृत्यू

Mumbai-Pune Expressway Khopoli accident news : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर खोपोलीजवळ भीषण अपघात झाला असून ५ गाड्या एकमेकांवर आदळल्या. या दुर्घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जखमींवर उपचार सुरू आहेत. अपघातामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.

Namdeo Kumbhar

सचिन कदम, साम टीव्ही प्रतिनिधी

Mumbai Pune Expressway multi vehicle accident near Khopoli tunnel full details : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ५ गाड्यांच्या भीषण अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर खोपोलीजवळ नवीन बोगद्याजवळ अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर प्रचंड वाहतूककोंडी झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याची माहिती देण्यात आली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य सुरू कऱण्यात आले आहे.

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर नवीन बोगद्याजवळ काहीवेळापूर्वी भीषण अपघात झालाय.अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलिसांकडून या तीन जणांची ओळख पटवण्याचे काम कऱण्यात येत आहे. अपघातानंतर पोलिसांनी तिघांचेही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने तात्काळ बाजूला करून वाहतूक सुरळीत कऱण्याचा प्रयत्न केला जात आहे. वाहतूक पोलिसांकडून या अपघात प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गांवर खोपोली एक्झिट जवळील नवीन बोगद्यात थोड्या वेळापूर्वी अपघात झाला. चार ते पाच गाड्या एकमेकांवर आदळल्यामुळे भयंकर अपघात झाला. या अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जणांना दुखापत झाल्याचे समजतेय. जखमींना पोलिसांकडून तात्काळ रूग्णालयात दाखल कऱणयात येत आहे.

खोपोली एक्झिटजवळ असलेल्या नवीन बोगद्यात आज सकाळी चार ते पाच वाहनांचा अपघात झाला. कार, कंटेनर आणि टँकरची एकमेंकाना जोरात धडक झाली.अपघात इतका भंयकर होता की कारचा चेंदामेंदा झाल्याचे व्हिडिओत दिसत आहे. अपघातानंतर उपस्थित असणार्‍यांनी तात्काळ मदत करण्यासाठी धाव घेतली. पोलीसही घटनास्थळाकडे पोहचले. आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, बोरघाट महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा, खोपोली पोलीस स्टेशनची यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, मृत्युंजय देवदूत आणि हेल्प फाउंडेशन मार्फत मदत कार्य सुरू करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

केरळमध्ये डावे हरले तर देशातून 'कम्युनिस्ट सरकार' पूर्णपणे संपणार?

इराण मुस्लीम देशांचा नवा लीडर? आखाती युद्धामुळे बदलणार गणित?

Mumbai Airport: मुंबई विमानतळावर भीषण आग पाहा VIDEO

महायुतीत 'चेकमेट'चं राजकारण, 2029 साठी आत्तापासूनच शह-काटशह

Maharashtra News Live Update: IT क्षेत्रातील महिलांच्या शोषण प्रकरणी महिला बालकल्याण विभाग लक्ष घालणार

SCROLL FOR NEXT