Mumbai IIT Bombay Blast News  AI Image
मुंबई/पुणे

Mumbai : IIT बॉम्बेमध्ये मोठी दुर्घटना! हॉस्टेलमध्ये अचानक भीषण आग, ५ विद्यार्थी होरपळले

Mumbai Powai IIT Gas Cylinder Blast News : मुंबईतील पवई येथील IIT कॅम्पसमधील हॉस्टेल क्रमांक ६ मध्ये गॅस सिलिंडरच्या पाइपमधून गळती झाल्याने भडका उडाला. दोन लहान मुलांसह पाच जण जखमी झाले असून, सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

Alisha Khedekar

  • मुंबईतील पवई येथील IIT कॅम्पसमधील हॉस्टेल क्रमांक ६ मध्ये गॅस गळतीमुळे आगीचा भडका

  • गॅस सिलिंडरच्या पाइपमधून गळती झाल्याची प्राथमिक माहिती

  • दुर्घटनेत दोन लहान मुलांसह एकूण पाच जण जखमी

मुंबईतील पवई परिसरातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) कॅम्पसमधील हॉस्टेल क्रमांक ६ मध्ये गॅस गळतीमुळे अचानक भडका उडाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत पाच जण जखमी झाले असून, त्यामध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

गॅस सिलिंडरच्या पाइपमधून गळती

मिळालेल्या माहितीनुसार, पवई येथील IIT कॅम्पसमधील हॉस्टेल क्रमांक ६ मध्ये गॅस सिलिंडरच्या पाइपमधून गॅसची गळती झाली. त्यानंतर अचानक फ्लेअर-अप म्हणजेच आगीचा भडका उडाला. या घटनेत जवळ असलेल्या पाच जणांना दुखापत झाली. घटनेचे नेमके कारण आणि गॅस गळती कशामुळे झाली, याबाबत अधिक तपास केला जात आहे.

जखमींमध्ये दोन लहान मुलांचा समावेश

या दुर्घटनेत अंश अहिरवार (१२), तहजीब आलम (९), ईश्वर सिंह (३७), शिवकुमार सिंह (३४) आणि अनिलकुमार यादव (२३) हे पाच जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये १२ आणि ९ वर्षांच्या दोन मुलांचा समावेश असल्याने या घटनेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. घटनेनंतर सर्व जखमींना सुरुवातीला राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर पाचपैकी चार जखमींना पुढील उपचारांसाठी कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आले, तर एका जखमीवर राजावाडी रुग्णालयातच उपचार सुरू आहेत. सर्व जखमींची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

गॅस गळतीमुळे भडका उडाल्याची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) वॉर्ड कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. संबंधित यंत्रणांकडून परिस्थितीची पाहणी करण्यात आली. या घटनेनंतर गॅस सिलिंडर आणि त्याच्या पाइपची सुरक्षितता हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: CJP आंदोलनाच्या आधीच पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी केलं डिटेन

Chocolate Mousse Recipe: चॉकलेट प्रेमींसाठी खास घरच्या घरी करा क्रीमी स्वादिष्ट चॉकलेट मूस, वाचा सोपी रेसिपी

Cancer Drug Prices: मोदी सरकारचा मोठा निर्णय; कॅन्सरची औषधं 70 टक्क्यांनी होणार स्वस्त

Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी योजनेचे ₹२००० खात्यात कधी जमा होणार? समोर आली मोठी अपडेट; असे तपासा यादीत तुमचे नाव

Tea Tips : चहा रोज प्यायला आवडत असेल तर, 'या' ६ चुका अजिबात करू नका; नाहीतर वाढेल कॅन्सरचा धोका

SCROLL FOR NEXT