Mumbai Powai Shock 17 Children Held Hostage in Powai Studio Saam
मुंबई/पुणे

Powai Hostage Case: वेबसीरीजसाठी ऑडिशन, हॉल रेंटवर घेतला; मुलांना डांबण्याचा प्लान, मुंबईतील ओलीसनाट्याचा थरार वाचा!

Mumbai Powai Hostage Case: पवईमधील स्टुडिओमध्ये २० मुलांना ओलीस ठेवण्यात आल्याचं घटना घडलीय. वेब सीरीजच्या ऑडिशनसाठी मुलं स्टुडिओमध्ये आली होती.

Bharat Jadhav

  • स्टुडिओमध्ये वेबसीरीज ऑडिशनच्या नावाखाली २० मुलांना ओलीस ठेवलं

  • आरोपी रोहित आर्य यूट्यूबर आहे.

  • सर्व मुलांची सुटका करण्यात आलीय.

मुंबईतील पवई परिसरातील आरए स्टुडिओमध्ये २० मुलांना ओलीस ठेवल्याची घटना घडलीय. चांदिवली येथील एका स्टुडिओमध्ये मुलांना डांबून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिासंनी इमारतीला घेरत मुलांची सुटका केली. तर आरोपी रोहित आर्यला ताब्यात घेतलंय. ओलीस ठेवण्यात आलेली सर्व मुले १५ वर्षांखालील आहेत. २० ते २२ मुला-मुलींना एका खोलीत बंद करुन ठेवण्यात आले होते.

वेबसीरीजसाठी ऑडिशन

गेल्या पाच दिवसांपासून या भागात शूटिंग ऑडिशन चालू आहे. एका वेबसीरिजसाठी ऑडिशन घेतलं जात होतं. त्यामुळे अनेक मुलं येथे येत होती. आज सर्व मुलांना ओलीस ठेवलंय याची माहिती खु्द्द संबंधित आरोपीने व्हिडिओद्वारे दिली. याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि NSG कमांडो पोहोचले. त्यानंतर अग्निशमन दल आणि पोलिसांच्या मदतीने मुलांची सुटका करण्यात आली.

मुलांनी ओलीस ठेवल्यानंतर आरोपी रोहित आर्य याने इमारतीला आग लावून जीवन देईन अशी धमकी दिली होती. मुलांना कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये, यासाठी पोलिसांनी आरोपीसोबत चर्चा करत त्याला विश्वासात ताब्यात घेतलं.

आरोपी रोहितचा प्लान काय होता?

रोहित आर्य आरोपीचं नाव आहे. मुलांना ओलीस ठेवल्यानंतर त्याने प्रसारित केलेल्या व्हडिओमध्ये त्याच्या प्लॅन बाबत माहिती दिली. मुलांना ओलीस ठेवायचं होतं. कारण आपल्या काही मागण्या आहेत. मात्र मी कोणी दहशतवादी नाहीये. पण काही लोकांना प्रश्न करायचे आहेत. त्यासाठी मुलांना ओलीस ठेवण्याचा प्लॅन आखला होता. मी आधी आत्महत्या करणार होतो, पण त्याऐवजी या मुलांना बंदी बनवलं, असं रोहित आर्यने व्हिडिओत सांगितलं. आपल्या काही साध्या मागण्या आहेत. मला संवाद साधायचाय, काही बोलायचं आहे, मला काही लोकांशी बोलायचं आहे, त्यांना प्रश्न विचारायचे आहेत, असं रोहित आर्यने आपल्या व्हिडिओमध्ये म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Travel : नवीन वर्षात ट्रेकिंगसाठी खास लोकेशन, मुंबईपासून जवळ आहे 'हे' ऐतिहासिक ठिकाण

Dusky Skin Makeup Tips: सावळ्या रंगाच्या त्वचेवर अशा पद्धतीने करा मेकअप; चेहऱ्यावर दिसेल नॅचरल ग्लो

Ladki Bahin : "आम्हालाच मत द्या, नाहीतर 'लाडकी बहीण'चे ₹१५०० बंद करू, भाजप नेत्यांकडून ब्लॅकमेल"

Maharashtra Live News Update: अमरावती शहरात मतदारसंख्येत मोठी वाढ

Kitchen Hacks: कांद्यावर काळे डाग येऊ नये म्हणून करा हे सोपे उपाय

SCROLL FOR NEXT