Mumbai Pollution Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Pollution: मुंबई विषारी हवेच्या विळख्यात! जगात ५व्या क्रमांकावर, कोरोना होऊन गेलेल्यांसाठी अधिक धोका

Mumbai Pollution News: दिल्ली प्रदूषण कंट्रोल कमिटीचे चेअरमन अश्विनी कुमार यांनी केंद्रीय पर्यावर मंत्र्यांनाही याबाबत पत्र लिहिलं आहे.

Ruchika Jadhav

Mumbai Pollution:

संपूर्ण देशात प्रदूषण ही एक गंभीर समस्या बनली आहे. प्रदूषणाने शनिवारी उच्चांक गाठला. त्यामुळे दिल्लीतील अनेक व्यक्तींना श्वास घेण्यास अडथळा निर्माण झाला. दिल्लीत काल AQI ४०० च्या पुढे होते. IQAir ने जगभरातील प्रदूषणाबाबत एक सर्वे केला आहे. यातील प्रदूषणाच्या यादीत आपल्या भारतातील एकूण ३ शहरांची नावे आहेत.

भारतातील सर्वाधिक प्रदूषित ३ शहरे

IQAir ने केलेल्या निरीक्षणात भारतातील दिल्ली हे शहर प्रदूषणाच्या पहिल्या क्रमांकावर आहे. कोलकत्ता प्रदूषणातील चौथ्या क्रमांकावर आहे. येथे १७० AQI ची नोंद झालीये. तर मुंबई पाचव्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर १८० AQI सह पाकिस्तानमधील लाहोर शहर आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, दिल्ली आणि मुंबईतील प्रदूषणाची समस्या पुढील तीन दिवस अशाच पद्धतीने कायम राहणार आहे. नागरिकांना काही दिवस प्रदूषणाशी सामना करावा लागणार आहे. ५ ते ७ नोव्हेंबरपर्यंत प्रदूषण जास्त प्रमाणात असणार आहे. दिल्ली प्रदूषण कंट्रोल कमिटीचे चेअरमन अश्विनी कुमार यांनी केंद्रीय पर्यावर मंत्र्यांनाही याबाबत पत्र लिहिलं आहे.

ज्यांना कोरोना झाला होता त्यांनी सावधान!

कोरोना काळात अनेक व्यक्तींनी या विषाणूवर मात केली. मात्र आता नागरिकांनी अधिक काळजी घेतली पाहिजे. कोरोना झालेल्या व्यक्तींना प्रदूषणामुळे दम्यासारखे आजार उद्भवण्याची शक्यता वर्तवण्यात आलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Death: पोलीस दलात आत्महत्येचं सत्र काही थांबेना! ४ दिवसात ३ आत्महत्या, काय आहे कारण?

Mahalaxmi Vrat 2025 : महालक्ष्मी व्रताची तारीख, पूजा विधी, महत्व घ्या जाणून

Maharashtra Live News Update: ते वक्तव्य करून अजित पवारांकडून मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न; राम शिंदेंचा आरोप

Gunfire Shooting : क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार! तिघांचा जागीच मृत्यू, आठजण जखमी

Astro Tips: सकाळी उठल्यावर आरशात पाहणे शुभ असते की अशुभ?

SCROLL FOR NEXT