मुंबई: काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ईडीचा (ED) मोठा घोटाळा बाहेर काढणार असल्याचे सांगितले होते. याप्रकरणी संजय राऊत यांनी मुंबई पोलिसांना (Police) माहिती दिली होती. आता मुंबई पोलिसांनी यावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. संजय राऊत यांच्या तक्रारीत ज्यांची नावे आढळली आहेत. त्यांना आणि त्या कंपन्यांना नोटीसा पाठवून मुंबई पोलिसांनी माहिती मागवली आहे.
संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेऊन जितेंद्र नवलानीबद्दल आरोप केले होते. केंद्रीय एजन्सीजना हाताशी धरून महाराष्ट्राचे महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा भाजपचा (BJP) डाव आहे. बोगस कंपन्या दाखवून गैरव्यवहार करत आहेत. यासंदर्भात आपल्याकडे पुरावे असल्याचे राऊत म्हणाले होते.
जितेंद्र नवलानी (Jitendra Navlani) आणि ईडी यांच्याविरोधात तक्रारीत नाव असलेल्या कंपन्यांविरोधात महाविकास आघाडी सरकारने कारवाई सुरू केलीये. जितेंद्र नवलानी आणि ईडी (ED) अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार पत्रात ज्या कंपन्यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता, अशा कंपन्यांच्या संचालकांना मुंबई पोलिसांनी समन्स बजावले असल्याचे बोलले जात आहे.
या प्रकरणी ईओडब्ल्यूने काल दोन जणांचे जबाब नोंदवले आहेत. ज्या कंपन्यांच्या नावासमोर पैसे आले आहेत, त्यांचे माध्यम कोणते आहे आणि ते कसे आले हे EOW शोधत आहे. त्यामुळे आता मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) कारवाईला वेग आल्याचे समोर आले.
काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या विरोधात ईडीने (ED) मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे आता राज्यातील राजकारण चिघळले आहे. राज्यात भाजप विरुध्द महाविकास आघाडीचे कारवाई सत्र सुरु झाले आहे.
Edited By - Santosh Kanmuse
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.