Black Salt vs Regular Salt : काळं मीठ की साधं मीठ? हाय ब्लड प्रेशरच्या रूग्णांनी कोणते मीठ खावे?

Manasvi Choudhary

हाय ब्लड प्रेशर त्रास

हाय ब्लड प्रेशर असलेल्या रूग्णांनी आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे यासाठी खाण्यापिण्याच्या सवयींकडे विशेष लक्ष देणे महत्वाचे आहे.

High Blood Pressure | pinterest

काळे मीठ की साधं मीठ, कोणते मीठ वापरावे?

हाय ब्लड प्रेशर असणाऱ्यांनी आहारातील मीठ म्हणजेच सोडियमचे प्रमाण कमी करणे महत्त्वाचे आहे. हाय ब्लड प्रेशरचा त्रास असणाऱ्यांना अनेकदा प्रश्न पडतो की, आहारात काळे मीठ की साधं मीठ, कोणते मीठ वापरावे?

Black Salt vs Regular Salt Which is Best for High Blood Pressure | yandex

साधं मीठ

साध्या मीठामध्ये सोडियम क्लोराईडचे प्रमाण अधिक असते. यामुळे जास्त प्रमाणात साधं मीठ खाल्ल्याने शरीरात पाणी साचून राहते, रक्तवाहिन्यांवर ताण येतो आणि रक्तदाब वेगाने वाढू शकतो. त्यामुळे हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी साध्या मिठाचे सेवन मर्यादित प्रमाणात करणे महत्वाचे आहे.

salt | pinterest

काळं मीठ

काळं मीठ हे साध्या मिठाच्या तुलनेत नैसर्गिक असते. या मिठावर कोणतीही प्रक्रिया केलेली नसते. या मिठामध्ये सोडियमचे प्रमाण साध्या मिठापेक्षा कमी असते.

Black Salt

ॲसिडिटी किंवा पोट फुगण्याचा त्रास होत नाही

काळ्या मीठामध्ये पोटॅशियम आणि खनिजे ही पोषणतत्वे असल्याने आहारात वापरल्यास अन्नपचन लवकर होतो आणि यामुळे ॲसिडिटी किंवा पोट फुगण्याचा त्रास होत नाही.

acidity | canva

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| saam tv

NEXT: Pitru Paksha 2026: यावर्षी पितृपक्ष कधी आहे? जाणून घ्या तारीख आणि महत्व

Pitru Paksha 2026
येथे क्लिक करा..