Mumbai Drugs Racket Busted
Mumbai Drugs Racket Busted SAAM TV
मुंबई/पुणे

Mumbai Drugs Racket Busted| बापरे! मुंबईजवळील नालासोपाऱ्यात १४०० कोटींचे ७०३ किलो ड्रग्ज जप्त

साम न्यूज नेटवर्क

चेतन इंगळे

Mumbai Drugs Racket Busted मुंबई: मुंबईपासून जवळच असलेल्या पालघर जिल्ह्यातील नालासोपाऱ्यात ड्रग्ज तस्करीविरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी विभागाने नालासोपाऱ्यात धडक कारवाई केली असून, ७०३ किलो एमडी ड्रग्ज जप्त केले आहे.

मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी (ANC) विभागाने ही कामगिरी केली आहे. ७०३ किलो एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. याची किंमत बाजारात १४०३ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली आहे. यात एका महिलेचाही समावेश आहे. (Mumbai Police)

मिळालेल्या माहितीनुसार, पालघर (Palghar) जिल्ह्यातील नालासोपाऱ्यात (Nalasopara) एका मॅन्युफॅक्चरिंग युनिटवर मुंबई पोलिसांच्या गुन्हे विभागाच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने गुरुवारी छापे मारले. तब्बल ७०३ किलो एमडी (Drugs) जप्त करण्यात आले. या जप्त केलेल्या अंमली पदार्थाची किंमत बाजारात १४०३ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

एएनसीने या प्रकरणात ५ आरोपींना अटक केली आहे. यात एका महिलेचाही समावेश आहे. अटक केलेल्या आरोपींविरोधात एनडीपीएस कायद्यान्वये कारवाई करण्यात येत आहे. हे सर्व आरोपी मानखुर्द, घाटकोपर, गोवंडी, नालासोपारा येथील आहेत.

सोशल मीडियाच्या माध्यमातून हे ड्रग्ज विकले जात असल्याची माहिती समोर आली आहे. बहुतांश ड्रग्जचा पुरवठा मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये होत होता. या टोळ्या २५ किलोपेक्षा जास्त वजनाच्या ड्रग्जचा पुरवठा करत असल्याचेही समजते. ही ड्रग्ज तयार करणारी फॅक्टरी असल्याचे सांगितले जात असून, या प्रकरणाचा तपास जागतिक पातळीवर सुरू आहे.

Edited By - Nandkumar Joshi

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SUV Cars in India: जबरदस्त लूक आणि पॉवरफुल इंजिन, 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत येतात या SUV

Porsche New Car: व्हॉईस कमांड, 6 एअरबॅग्ज आणि 270kmpl स्पीड; पोर्शची डॅशिंग कार भारतात लॉन्च

Mumbai News : जेव्हीएलआर मार्गावरील वाहतुकीत ३१ मे पर्यंत बदल, नेमकं काय आहे कारण?

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

Canada Import from India : कॅनडा भारताकडून काय मागवतो

SCROLL FOR NEXT