mumbai police
mumbai police  saam tv
मुंबई/पुणे

Mumbai News: मुंबई पोलिस धावले गोवा दूरदर्शनच्या मदतीला; असा मिळवून दिला १० लाखांचा कॅमेरा

Vishal Gangurde

संजय गडदे

Mumbai News: जगात स्कॉटलंड पोलिसांनंतर मुंबई पोलीस दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तपासाच्या बाबतीत मुंबई पोलीस हे अव्वल आहेत, याचा प्रत्यय सोमवारी गोवा दूरदर्शनच्या दोन कर्मचाऱ्यांना आला. या कर्मचाऱ्यांच्या तक्रारीचं निवारण वेळेत केल्याने पोलिसांनी केलेल्या मदतीचं त्यांनी तोंड भरून कौतुक केलं आहे. (Latest Marathi News)

गोवा दूरदर्शनचा कॅमेरा टेक्निशियन हे दुरुस्तीसाठी अंधेरी एमआयडीसी परिसरात घेऊन आले असता घाई गडबडीत रिक्षातच विसरले. मात्र, कसलीही माहिती किंवा सुगावा नसताना एमआयडीसी पोलिसांनी त्या रिक्षावाल्याचा शोध घेऊन कॅमेरा पुन्हा गोवा दूरदर्शनच्या टेक्निशियन कर्मचाऱ्यांच्या हाती सोपवला.

यामुळे या दोन्ही कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे पोलिसांनी रिक्षावाल्याला पवई फिल्टर पाडा परिसरातून शोधून कॅमेरा कर्मचाऱ्यांना सोपवला.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, गोवा दूरदर्शन मध्ये टेक्निशियन म्हणून काम पाहणारे धनराज गिरी हे पणजी येथून अंधेरी एमआयडीसी परिसरातील कॅमेरा दुरुस्तीच्या दुकानात कॅमेरा दुरुस्ती करण्यासाठी आले होते. कॅमेरा दुरुस्ती झाल्यानंतर कर्मचारी रिपोर्टिंग करण्यासाठी मुंबई दूरदर्शनच्या वरळी कार्यालयाकडे निघाले असता चकाला मेट्रो स्थानकाकडे रिक्षा पकडली.

रिक्षाच्या डिक्कीतून कॅमेऱ्याचा बॉक्स ठेवून त्यांनी प्रवासाला सुरुवात केली. मात्र चकाला परिसरात पोहोचल्यानंतर रिक्षातून उतरताना बॉक्स सोबत घेण्यास विसरले. यामुळे त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये कॅमेरा हरवल्याची तक्रार दिली.

मुंबईच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी व.पो. नि. गायकवाड आणि पोलीस अधिकारी यश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या प्रवासाच्या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासून रिक्षाचा शोध घेतला.

ही रिक्षा पवई फिल्टर पाडा परिसरातील असल्याचे समजताच पोलीसांनी त्या ठिकाणी जाऊन त्या रिक्षा चालकाची चौकशी केली असता त्याच्याकडे तो कॅमेरा आढळून आला.कॅमेरा ताब्यात घेऊन मंगळवारी झोन 10.चे डी सी पी महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते तो कॅमेरा कर्मचाऱ्यांना सोपवण्यात आला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Johnny Lever: कोण आहे आमिर खान? मुलाखतीदरम्यान जॉनी लीव्हर काय म्हणाला? VIDEO

KKR vs DC: इडन गार्डनवर दिल्लीचं 'पानीपत'; IPLमधील कोलकाताचा ६वा विजय

Maharashtra Election:'..त्यांचा सत्यानाश होणार'; अकलूजमधून फडणवीसांचा मोहिते-पाटलांना इशारा

3.99 लाख रुपये किंमत, 25km मायलेज; सीएनजी आणि इलेक्ट्रिकपेक्षा बहजत 'या' कारला आहे मागणी

Maharashtra Election: नाशकातून शिंदे गटाने तिकीट दिल्याचा दावा; कोण आहेत शांतीगिरी महाराज?

SCROLL FOR NEXT