Baba Siddique Death Latest News Saam TV
मुंबई/पुणे

Baba Siddique : मोठी बातमी! बाबा सिद्धीकींवर गोळीबार करणाऱ्या तिसऱ्या आरोपीची ओळख पटली; नावंही आली समोर

Baba Siddique Death Latest News : बाबा सिद्धीकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या तिन्ही आरोपींची पोलिसांनी ओळख पटवली असून यातील दोघांना अटक केली आहे.

Satish Daud

मुंबई : राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्धीकी यांची मुंबईच्या वांद्रे परिसरात शनिवारी रात्री तिघांनी गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेनं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत तिन्ही आरोपींची पोलिसांनी ओळख पटवली आहे. यातील दोन आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे. तिसऱ्या आरोपीच्या शोधासाठी गुन्हे शाखेची ४ पथकं राज्याबाहेर रवाना झाली आहे. लवकरच आरोपीच्या मुसक्या आवळल्या जाणार आहेत.

या गुन्ह्यात चौथ्या आरोपीचा देखील समावेश असू शकतो, असा संशय पोलिसांनी वर्तवला आहे. करनैल सिंह आणि धर्मराज कश्यप असं सिद्धीकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. करनैल सिंह हरियाणाचा तर धर्मराज कश्यप उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. यातील काही आरोपी हे बिश्नोई गँगचे मेंबर आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्या इतर साथीदारांचा कसून शोध घेतला जात आहे.

बाबा सिद्धीकींची हत्या कशी झाली?

मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्धीकी हे शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास वांद्रे परिसरात होते. तिथे त्यांचा मुलगा आमदार झिशान सिद्धीकी यांचे ऑफिस आहे. त्यांची भेट घेऊन बाबा सिद्धीकी घरी निघाले. त्यावेळी वांद्रेतील खेरवाडी जंक्शनच्या परिसरात गोळीबार तीन आरोपींनी त्यांच्यावर धडाधड गोळीबार केला.

धक्कादायक बाब म्हणजे, ज्या ठिकाणी हा गोळीबार झाला तेथील पथदिवे देखील बंद होते. तसेच या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे देखील नव्हते. याच गोष्टीचा फायदा घेऊन आरोपींनी दोन बंदुकीतून एकूण ६ गोळ्या झाडल्या. यातील तीन गोळ्या सिद्धीकी यांच्या छातीत घुसल्या. तर एक गोळी त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीच्या पायाला लागली.

सिद्दिकी यांची कार बुलेटप्रुफ असूनही दोन गोळ्या गाडीच्या काचेतून आतमध्ये शिरल्या. त्यामुळे आरोपींकडे अत्याधुनिक बनावटीचे पिस्तूल असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सर्व आरोपी बाबा सिद्दिकी यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून पाळत ठेवत होते. बिश्नोई गँगकडून बाबा सिद्धीकी यांची हत्या झाली असावी, असा संशय देखील पोलिसांना आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT