Baba Siddique : वाय दर्जाची सुरक्षा, पण तरीही आरोपींनी झाडल्या धडाधड गोळ्या; बाबा सिद्धीकींच्या हत्येचा थरार

Baba Siddique Latest News : केंद्राची वाय दर्जाची सुरक्षा असतानाही सिद्धीकी यांची हत्या कशी झाली? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
Baba Siddique Latest News
Baba Siddique Latest NewsSaam TV
Published On

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्धीकी यांची शनिवारी रात्री मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात सिद्धीकी गंभीर जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. बाबा सिद्धीकी यांच्या निधनाने राजकीय वर्तुळ हळहळलं आहे. केंद्राची वाय दर्जाची सुरक्षा असतानाही सिद्धीकी यांची हत्या कशी झाली? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

Baba Siddique Latest News
Baba Siddique Accuse EXCLUSIVE: बाबा सिद्दिकींवर गोळी झाडणारा हाच 'तो' आरोपी; पाहा व्हिडिओ

विशेष बाब म्हणजे, आपल्या जीवाला धोका आहे, असं स्वत: बाबा सिद्दीकी यांनी १५ दिवसांपूर्वी सांगितलं होतं. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मागणीवरून केंद्र सरकारने त्यांना वाय दर्जाची सुरक्षा दिली होती. असे असताना देखील सिद्धीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

बाबा सिद्धीकी यांची हत्या कशी झाली?

बाबा सिद्धीकी यांचा मुलगा झीशान सिद्दीकी यांचे मुंबईतील वांद्रे पूर्व येथे कार्यालय आहे. शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास बाबा सिद्धीकी हे मुलाच्या कार्यालयाकडे जात होते. त्याचवेळी तीन आरोपी आले आणि त्यांनी सिद्धीकी यांच्यावर धडाधड गोळ्या झाल्या. यातील दोन गोळ्या त्यांच्या छातीत शिरल्या. जखमी अवस्थेत सिद्धीकी यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तेथे डॉक्टरांनी तपासणी करत त्यांना मृत घोषित केलं. दरम्यान, या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील दोन संशयितांना अटक केली आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) प्रकल्पाच्या वादातून हा हल्ला झाला असावा, असे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.

बाबा सिद्दीकी यांचे नाव बॉलिवूडमध्येही खूप प्रसिद्ध होते. त्यांनी अनेकदा बॉलिवूड सेलिब्रिटींना इफ्तार पार्ट्या दिल्या होत्या. इतकंच नाही तर त्यांनी शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यातील वाद देखील मिटवला होता. त्यामुळे त्याची खूप चर्चा झाली. सिद्धीकी यांच्या हत्येमुळे बॉलिवूड क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Baba Siddique Latest News
Who is Baba Siddique: नगरसेवक ते मंत्री.. मुंबईमधील बाहुबली नेता, बॉलिवूडमध्येही दबदबा; कोण होते बाबा सिद्दीकी?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com