Aryan Khan Case: मुंबई पोलीस नोंदविणार खंडणीचा गुन्हा? 
मुंबई/पुणे

Aryan Khan Case: मुंबई पोलीस नोंदविणार खंडणीचा गुन्हा?

मुंबई पोलिसांच्या एसआयटी टीमकडून खंडणीचा गुन्हा नोंदवण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. त्यामुळे आर्यन खान प्रकरणात लवकरच खंडणीचा गुन्हा दाखल होऊ शकतो.

सुरज सावंत

मुंबई: आर्यन खान अटकेप्रकरणी खंडणी वसुलीचा डाव होता असा आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होताय याच प्रकरणात आता मुंबई पोलिस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. तथाकथित खंडणीविरोधात मुंबई पोलिसांच्या एसआयटी टीमकडून खंडणीचा गुन्हा नोंदवण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. त्यामुळे आर्यन खान प्रकरणात लवकरच खंडणीचा गुन्हा दाखल होऊ शकतो.

हे देखील पहा -

शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी यांना तीन दिवसांपूर्वी समन्स बजावण्यात आले होते. मात्र प्रकृतीचे कारण सांगून त्या चौकशीसाठी हजर झालेल्या नव्हत्या. पूजा ददलानीचा जबाब नोंद होत नसल्यामुळे गुन्हा नोंद होण्यात अडचणी निर्माण होत आहेत. कारण पुजा ददलानी ह्याच त्यावेळी घटनास्थळी उपस्थित होत्या त्यामुळे त्यांच्या जबाबाशिवाय खंडणीचा गुन्हा पोलिसांना थेट घेता येत नसल्याचे सूत्राकडून सांगण्यात येत आहे.

जर पूजा ददलानी त्यांचा जबाब नोंदवायला आल्या नाही तर, मुंबई पोलिस कायदेशीर मत घेऊन या प्रकरणी सुओमोटो एफआयआर करायचा की नाही याचा निर्णय घेतील. आतापर्यंतच्या तपासात समीर वानखेडे किंवा एनसीबीच्या कोणत्याही अधिकाऱ्याचा थेट संबंध सिद्ध झालेला नाही. मुंबई पोलिसांनी आतापर्यंत १५ जणांचे जबाब नोंदवले आहेत तसेच मुंबई पोलिसांनी सॅम डिसोझा यांनाही समन्स बजावले आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अचलपुरात बच्चू कडूंना मोठा धक्का; भाजपचे प्रवीण तायडे विजयी

UdyanRaje Bhosle News : उदयन राजेंची शरद पवारांवर विखारी टीका, पाहा Video

Viral Video: बापरे! खोल विहिरीत महिलांनी घेतला झोका; VIDEO व्हायरल होताच नेटकरी झाले हैराण

Health Diet: तुमच्या रोजच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असणे महत्वाचे आहे? जाणून घ्या फायदे

Jharkhand Assembly Election Result: महाराष्ट्रात सेंच्युरी करणाऱ्या भाजपचा झारखंडमध्ये का झाला पराभव; काय आहेत कारण?

SCROLL FOR NEXT