Fake Police Salary Fraud Saam TV
मुंबई/पुणे

Fake Police Fraud: खाकी वर्दीला भ्रष्टाचाराचा विळखा, पोलीस दलात वेतन घोटाळा; बोगस पोलिसांच्या नावे कोट्यवधींवर डल्ला

Fake Police Salary Fraud: खाकी वर्दीला आता भ्रष्टाचारानेच विळखा घातलाय. बोगस पोलिसांच्या नावानं पोलिस दलात वेतन घोटाळा कसा झाला? अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अभद्र युतीनं सरकारी तिजोरीतल्या कोट्यवधी रुपयांवर कसा डल्ला मारला? पाहूयात या विशेष रिपोर्टमधून.

Suprim Maskar

Mumbai Police: इतरांचे घोटाळे उघडकीस आणणाऱ्या मुंबई पोलीस दलातच मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश झालाय. पोलीस दलातील प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीच कोट्यवधींचा वेतन घोटाळा केलाय. बनावट पोलीसांच्या नावानं असणाऱ्या बँक खात्यांवर पगाराची रक्कम वळवण्यात आली. त्यामुळे सरकराच्या तिजोरीतील साडेसहा कोटी रुपयांवर डल्ला मारण्यात आलाय. पोलीस दलात नेमका हा घोटाळा कसा झाला. पाहूयात...

पोलीस दलात वेतन घोटाळा

2019-20मधील ऑडिटमध्ये पोलिसांच्या पगाराच्या रकमांमध्ये तफावत आढळली. पोलीस नसलेल्या 8 ते 10 जणांच्या नावे बोगस पगार काढण्यात आला होता. जुन्या 'सेवार्थ' प्रणालीतून नवीन प्रणालीत डेटा स्थलांतरित करताना हा गैरप्रकार उघडीस आला. कल्याणकारी योजना, प्रशासकीय कामांसाठी राखीव असलेला निधी या घोटाळ्यातून वळवल्याचा संशय ऑडिट टिमला आला. त्यानंतर ऑडिट टीमकडून आर्थिक अनियमिततेचा सविस्तर अहवाल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सादर करण्यात आला. ज्यानंतर मुंबई पोलीस दलात साडेसहा कोटींचा वेतन घोटाळा झाल्याचं समोर आलयं. याप्रकरणी आता समतानगर पोलीस ठाण्यात 5 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून गृहखात्यातील 2 क्लर्कचं तत्काळ निलंबन करण्यात आलयं.

दरम्यान महाराष्ट्रात गृहखात्यात आंधळा कारभार सुरू असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी केलाय. तर, या प्रकरणात चौकशीची मागणी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केलीय. तर, साम टीव्हीच्या बातमीनंतर दोषींवर कठोर कारवाई करण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्र्यांनी दिलीय.

यापूर्वी धुळे आणि लातूर येथेही अशाच प्रकारे कोट्यवधी रुपयांचा पगार घोटाळा उघडकीस आला होता. त्यामुळे मुंबईतील हा घोटाळा त्याच रॅकेटचा भाग आहे का? किंवा यामागे मोठे आंतरजिल्हा जाळे सक्रिय आहे का? याचा समांतर तपास पोलिस करत आहेत. तसेच, कल्याणकारी योजना आणि प्रशासकीय कामांसाठी राखीव असलेला निधी ही या घोटाळ्यातून वळवण्यात आल्याचा संशयही पोलिसांना आहे. त्यामुळे पोलिस दलातील हा घोटाळा फक्त वेतनापुरता मर्यादीत नसून यामागील कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचे धागेदोरे शोधून काढणं पोलिसांसमोरील मोठं आव्हानं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips: चालताना पायाचे तळवे का दुखतात? काय आहेत कारणं?

Maharashtra News Live Update: आंबोली महादेवगड येथील खोल दरीत पर्यटक कोसळला

Curry Leaves Benefits : केसगळती ते डायबेटिस...रोज कढीपत्ता खाल्ल्यानं होतील ६ जबरदस्त फायदे, वाचा

Sunetra Pawar : जनाची तरी लाज बाळगा; सुनेत्रा पवारांवर टिप्पणी करणाऱ्या काँग्रेसवर शिंदे कडाडले

Maharashtra Politics: राष्ट्रवादीत मोठी घडामोड! शरद पवार पक्षाच्या सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या बरखास्त

SCROLL FOR NEXT