Mumbai Crime  Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime : दिवाळीत सुकलेल्या काजूंपासून मिठाई; मुंबईत मोठी कारवाई

Mumbai Crime News : मुंबईच्या दिवाळीत सुकलेल्या काजंपासून मिठाई तयार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यानंतर पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाई केली आहे.

Saam Tv

सचिन गाड, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : दिवाळी सणामुळे बाजारात ग्राहकांची लगबग वाढली आहे. सणासाठी खरेदी करण्याची ग्राहकांची झुंबड पाहायला मिळत आहे. या सणात अनेकांचा मिठाई खरेदी करण्याचाही कल असतो. अनेक ग्राहक मोठ्या आवडीने मिठाईच्या दुकानातून कुजलेले काजू आणि सेकामेव्याची मिठाई खरेदी करत असतात. याचदरम्यान, मुंबईत अस्वच्छ पद्धतीने मिठाई बनवल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत कुजलेले काजू आणि सुकामेव्याचा वापरकरून मिठाई बनवणाऱ्यांवर आर्थिक गुन्हे शाखेच्या सीबी कंट्रोलने मोठी कारवाई केली आहे. सीबी कंट्रोल आणि अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई केली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर यंत्रणा सतर्क झाली आहे.

मुंबईच्या बोरिवलतील मां आशापुरा स्वीट्सवर सीबी कंट्रोलने धाड टाकली. सीबी कंट्रोल आणि अन्न व औषध प्रशानाच्या अस्वच्छ पद्धतीने मिठाई बनवल्या प्रकरणी कारवाई केली आहे. यावेळी तब्बल ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या विभागाकडून ३३६९ किलो काजू कतली, ११२३ काजू पावडर, ३८०९ किलो काजू , २८ किलो मिठाई आणि ५८ किलो तूप जप्त करण्यात आले आहेत.

दरम्यान, बोरिवलीत कामगारांकडून अस्वच्छ पद्धतीने काजू कतली आणि सुकामेव्याची मिठाई तयार करण्यात येत होती. त्याच ठिकाणी धाड टाकून कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या गुन्हे शाखेने या कामगारांनी तयारी केलेली मिठाई जप्त केली. दिवाळीच्या तोंडावर मिठाई दुकानावर कारवाई केल्याने ग्राहकांची चिंता वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ichalkaranji Exit Poll: शरद पवारांची पावसातली सभा करिष्मा करणार का? पाहा Exit Poll चा अंदाज

Arjun Kapoor: रब राखा! मलायकासोबतच्या ब्रेकअपनंतर अर्जुनने 'त्या' खास व्यक्तीसाठी काढला टॅटू, कोण आहे ती?

IND vs AUS: पर्थमध्ये पुन्हा टॉस बनणार बॉस? पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या टीमचा विजय निश्चित? पाहा रेकॉर्ड

Maharashtra Exit Poll: कोल्हापूर उत्तर मतदारसंघामध्ये राजेश लाटकर होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Indapur Exit Poll : इंदापूरमध्ये तुतारीचा आवाज घुमणार, एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना मोठा झटका

SCROLL FOR NEXT