Ichalkaranji Exit Poll: शरद पवारांची पावसातली सभा करिष्मा करणार का? पाहा Exit Poll चा अंदाज

Ichalkaranji Exit Poll News: उद्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. इचलकरंजी मतदारसंघातून भाजपचे राहुल आवडे विजयी होण्याची शक्यता आहे.
Ichalkaranji Exit Poll
Ichalkaranji Exit PollSaam Tv
Published On

उद्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या निवडणुकीत कोणाचं पारडं जड होणार आहे, याकडे सर्वांचेच लक्ष आहे. मतदानानंतर एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. सकाळच्या एक्झिट पोलनुसार, इचलकरंजी मतदारसंघात भाजपचे पारडं जड होताना दिसत आहे.

इचलकरंजीमध्ये राहुल अवाडे हे निवडून होण्याची शक्यता आहे. इचलकरंजीमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट अशी लढत होणार आहे. या मतदारसंघात मागच्या दोन टर्ममध्ये भाजपचे आमदार निवडून आले होते.

राहुल आवडे हे विद्यमान आमदार प्रकाश आवडे यांचे चिरंजीव आहेत. त्यामुळे या मतदारसंघात त्यांचे नाव मोठ्या प्रमाणात घेतले जाते.त्यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री आणि दोन मुख्यमंत्री आले होते. त्यामुळे या मतदारसंघात राहुल आवडे निवडून येतील, असं वाटतं होतं.

Ichalkaranji Exit Poll
Maharashtra Exit Polls : शरद पवार की अजित पवार, पिंपरीकरांचा कौल कुणाला? संभाव्य आमदाराचे नाव स्पष्ट

दरम्यान, या मतदारसंघात शरद पवार गटाचे मदन कारंडे उभे आहे. शरद पवारांनी भरपावसात घेतलेली सभा हा टर्निंग पाँइंट ठरु शकतो. त्यामुळे एकतर्फी वाटणाऱ्या या मतदारसंघात काहीही होऊ शकतो.

Ichalkaranji Exit Poll
Maharashtra Exit Polls: पलूस-कडेगावमध्ये काँग्रेस गड राखणार? कोण बाजी मारणार? पाहा Exit Polls

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com