Mumbai Crime सुरज सावंत
मुंबई/पुणे

Mumbai Crime: काश्मिरमध्ये चरस पुरवणाऱ्या मुख्य आरोपीला अटक

विशेष म्हणजे हा आरोपी ज्या श्रीनगरच्या मगरमल बाग परिसरात राहतो. हा परिसर अतिसंवेदनशील आहे. दहशतवाद्यांचा वावरही या भागात असल्याने मुंबई पोलिसांना संरक्षणासाठी स्थानिक पोलीस ठाण्यातील १०० काश्मिरी पोलिसांची मदती घ्यावी लागली होती.

सुरज सावंत

मुंबई - गुन्हे शाखा पोलिसांनी (Police )आँक्टोंबर २०२१ मध्ये दहिसर परिसरात कारवाई करत, अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका कुटुंबाचा पर्दाफाश केला होता. या कारवाईत पोलिसांनी २४ किलोचं १४ कोटी रुपयांच चरस जप्त करत, बंडू उडनशिवे, ५२, त्याची पत्नी क्लेरा ५२, मुलगी सिंथिया २३ आणि जावई जसर जहांगीर शेख २४ यांना अटक केली होती. मात्र या टोळीला काश्मिरमध्ये (Kashmir) चरस पुरवणाऱ्या मुख्य आरोपी गुलजार मकबूल अहमद खान (४२) याला गुन्हे शाखा ६ च्या पोलिसांनी श्रीनगर पोलिसांच्या मदतीने अटक केली आहे.(Mumbai Crime Latest News)

हे देखील पहा -

विशेष म्हणजे हा आरोपी ज्या श्रीनगरच्या मगरमल बाग परिसरात राहतो. हा परिसर अतिसंवेदनशील आहे. दहशतवाद्यांचा वावरही या भागात असल्याने मुंबई पोलिसांना संरक्षणासाठी स्थानिक पोलीस ठाण्यातील १०० काश्मिरी पोलिसांची मदती घ्यावी लागली होती.

या परिसरात मोठ्या प्रमाणात चरस तस्करी होत असून यांचा संबध नार्को टेरिरिझमसाठी असल्याचे चौकशीत समोर आले आहे. मात्र आरोपींच्या यादीत गुलजारचे नाव नव्हते. मात्र मुंबई पोलिसांनी त्याला ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात अटक केल्याने काश्मिर पोलिसांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे. काश्मिरी चरस दर्जेदार असल्याने बाजारात नेहमीच त्याला मोठी मागणी असते. मोठ्या प्रमाणात पैसे कमवण्यासाठी आरोपी चरस तस्करीकरून पैसे कमवण्यासाठी हा धोका पत्करत असल्याचे पोलीस सांगतात.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भरपावसात आदिवासी महिलांचा अवैध दारू विरुद्ध एल्गार

Silent Heart Attack: सायलेंट हार्ट अटॅक कसा ओळखायचा, लक्षणे कोणती?

Maharashtra Politics: ठाकरेंसाठी अस्तित्वाची लढाई? मुंबई महापालिका कोण जिंकणार?

Sharad Pawar : शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी आक्रमक; शरद पवारांच्या नेतृत्वात नाशकात मोर्चा निघणार, VIDEO

Lalbaugcha Raja : ३३ तासांनी लालबागच्या राजाचं अखेर विसर्जन, पाहा शेवटची झलक; VIDEO

SCROLL FOR NEXT