mumbai crime news
mumbai crime news  saam tv
मुंबई/पुणे

Mumbai : अभिनेते अनू कपूर यांची लाखोंची ऑनलाईन फसवणूक करणारा गजाआड; आरोपीला बिहारमधून अटक

साम टिव्ही ब्युरो

संजय गडदे

Mumbai Crime News : सिनेअभिनेते अनू कपूर यांचे बँक खात्याची केवायसीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या आरोपीस बिहारमधून अटक करण्यात आली आहे. ओशिवरा पोलिसांच्या सायबर विभागाने केली ही कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आशिष जगदीश पासवान (28 वर्ष) आहे. (Latest Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ सप्टेंबर रोजी पावणे अकराच्या सुमारास फिर्यादी यांना एक फोन कॉल आला समोरील व्यक्तीने एचएसबीसी बँकेच्या मुख्य शाखेतून बोलत असल्याचे सांगून आपण आपल्या बँक खात्याची केवायसी केली नाही, तर बँकेचे खाते बंद होईल, असे सांगून अनू कपूर यांना विश्वासात घेऊन त्यांचे बँक खाते क्रमांक आणि मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक घेतला.

त्यानंतर अनू कपूर यांच्या खात्यातील तब्बल चार लाख 36 हजार रुपये काढून त्याने फसवणूक केली. खात्यातून पैसे गेल्याची बाब लक्षात येताच अनू कपूर यांनी यासंबंधीची तक्रार ओशिवरा पोलीस ठाण्यात येऊन नोंदवली.

तक्रारीची तात्काळ दखल घेऊन ओशिवरा पोलिसांच्या सायबर पथकाने प्राप्त माहितीच्या आधारे व आरोपीने ज्या खात्यामध्ये पैसे वळवले होते. त्या खात्यांची केवायसीसाठी वापरण्यात आलेले डॉक्युमेंट तपासून ते खाते आशिष जगदीश पासवान याच्या नावे असल्याचे शोधले.

यानंतर खात्याशी संबंधित मोबाईल नंबर बंद असल्यामुळे मोबाईलच्या आयएमइआय क्रमांकाच्या आधाराने आरोपीचा शोध घेतला. मोबाईल लोकेशन तपासले असता तो बिहार येथे असल्याचे आढळून आले. यानंतर सायबर पोलिसांचे एक पथक बिहारमध्ये (Bihar) जाऊन आरोपीला अटक करून घेऊन आले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breaking News: सांगलीत अंकलखोपमधील मतदान यंत्रात बिघाड

Inflation Fall In Pakistan: महागाईने पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; १ कप चहासाठी नागरिकांची वणवण

Kanakalatha Dies : प्रसिद्ध अभिनेत्रीचे प्रदीर्घ आजाराने निधन; २५० हून अधिक चित्रपटांत केले होते काम

Dance Effect on Health : मनसोक्त नाचा! डान्स करण्याचे आरोग्यासाठी भन्नाट फायदे

Top Vegetarian Country: जगातील शाकाहारी लोकांची टक्केवारी आली समोर ; भारताचा क्रमांक कितवा?

SCROLL FOR NEXT