Mumbai Police 12 personnel suspended and 3 dismissed in seven months saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Police: सात महिन्यात १२ निलंबित,३ जण बडतर्फ, बेशिस्त मुंबई पोलिसांवर कारवाईचा बडगा; पोलीस दलात खळबळ

Action Against Undisciplined Mumbai Cops: मुंबई पोलीस दलातील शिस्तभंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कठोर कारवाई केली आहे. सात महिन्यांत १२ पोलीस कर्मचारी निलंबित, तर ३ जणांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले. यामुळे पोलीस दलात खळबळ उडालीय.

Bharat Jadhav

  • मुंबई पोलीस दलातील 12 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

  • सात महिन्यात 3 मुंबई पोलीस कर्मचारी बडतर्फ

  • मुंबई पोलिसांवर शिस्तभंगाची मोठी कारवाई

मुंबई पोलीस दलातील शिस्तभंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. वेतन घोटाळा, कर्तव्यातील निष्काळजीपणा, गैरवर्तन आणि आर्थिक अनियमितता अशा प्रकरणांत कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कठोर भूमिका घेत सात महिन्यात 12पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केलय. तर तीन जणांना सेवेतून थेट बडतर्फ करण्यात आलंय.

मुंबई पोलिसांच्या वेतन घोटाळा प्रकरणात दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून, या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे आहे. सेवार्थ प्रणालीतील डिजिटल नोंदी, लॉगिन, वेतन मंजुरीची प्रक्रिया आणि संबंधित बँक खात्यांची तपासणी केली जातेय. या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग आहे का, याचाही तपास केला जातोय.

अमली पदार्थविरोधी कारवाईशी संबंधित एका प्रकरणात तरुण आंदोलकांना एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्ह्यात अडकवण्याची कथित धमकी दिल्याचा आरोप असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यात आलीय. त्याची तात्काळ बदली देखील करण्यात आली होती.

याआधी बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात सुरक्षा व्यवस्थेतील निष्काळजीपणाबद्दल पोलीस शिपाई श्याम सोनावणे यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते तसेच दीर्घकाळ विनापरवानगी गैरहजर राहिलेल्या काही कर्मचाऱ्यांवर निलंबन आणि बडतर्फीची कारवाई करण्यात आलीय. आर्थिक अनियमिततेच्या आरोपांवर दोन प्रशासकीय अधिकाऱ्यांचेही निलंबन करण्यात आले आहे.

मुंबई पोलीस दलात शिस्त, पारदर्शकता आणि जबाबदारी कायम ठेवण्यासाठी अशाप्रकरणांमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून स्पष्टकरण्यात आले आहे. विभागीय चौकशीतदोषी आढळणाऱ्यांवर आवश्यकतेनुसार कठोर प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Fat Loss : चेहऱ्यावर चरबी वाढतेय? 'हे' व्यायाम ट्राय करा; ८ दिवसात फरक जाणवेल

Monday Horoscope : धनवाढ होईल! ५ राशींच्या कामाच्या ठिकाणच्या समस्या कमी होतील, वाचा सोमवारचे राशीभविष्य

राष्ट्रवादीतील वाद पुन्हा चव्हाट्यावर; सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद जाणार? थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार

Nashik-Pune High-Speed ​​Railway Project: महामार्गावर रास्ता रोको' आंदोलन करणं भोवलं; आमदार सत्यजित तांबेंसह 300 आंदोलकांवर गुन्हे दाखल

पहिली ते बारावी एकच शाळा; नीती आयोगाच्या पर्यायानं शालेय शिक्षणात होणार मोठा बदल

SCROLL FOR NEXT