Mumbai Pod Taxi Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Pod Taxi: मुंबईत लवकरच पॉड टॅक्सी धावणार, कामाचा मूहूर्त ठरला, तिकीट फक्त ३० रुपये; जाणून घ्या सर्वकाही

Pod Taxi In Mira-Bhayander: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता लवकरच मीरा-भाईंदरमध्ये पॉड टॅक्सी धावणार आहे. पॉड टॅक्सीच्या कामाचा मूहूर्त ठरला आहे.

Siddhi Hande

मुंबईकरांची वाहतूक कोंडीपासून सुटका होणार

मीरा-भाईंदरमध्ये पॉड टॅक्सी धावणार

मार्चमध्ये कामाला सुरुवात होणार

मुंबईतील वाहतूक कोडींवर आता उपाय निघणार आहे. मुंबईत मीरा-भाईंदर शहरात येत्या दोन वर्षांत पॉड टॅक्सी सुरु होणार आहे. या पॉड टॅक्सीमुळे वाहतूक कोंडीपासून सुटका होणार आहे. याचसोबत प्रवासदेखील स्वस्तात मस्त होणार आहे.

पॉड टॅक्सीच्या कामाला मार्चमध्ये मूहूर्त (Pod Taxi Work Start From March)

पॉड टॅक्सीच्या कामाला मार्चमध्ये सुरुवात होणार आहे. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच मार्च २०२५ मध्ये हा प्रकल्प पूर्ण होईल. वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर पर्याय म्हणून प्रशासन वेगवेगळे उपाय काढत आहे. आता मार्चमध्ये पॉड टॅक्सीचे काम सुरु होणार आहे.

फक्त ३० रुपयांत करता येणार प्रवास (Pod Taxi Fare Starting From 30 Rupees)

पॉड टॅक्सी सुरु झाल्याने प्रवाशांना खूप फायदा होणार आहे. या पॉड टॅक्सीमुळे अवघ्या ३० रुपयात तुम्हाला प्रवास करता येणार आहे. याचसोबत तुमचा प्रवास अधिक वेगवान होणार आहे.

सध्या सर्वसामान्य लोक जास्तीत जास्त रिक्षाने प्रवास करतात. त्यांना आता पॉड टॅक्सीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. मीरा भाईंदरमध्ये न्यूट्रॉन ईव्ही मॉबिलिटी कंपनी पॉड टॅक्सी सुरु करणार आहे. हा करार ३० वर्षांसाठी होणार आहे.

या कंपनीने ३३ किमी मार्गाचे सर्वेक्षण केले आबे. यापैकी १४ किलोमीटरचा मार्ग पॉड टॅक्सीसाठी निश्चित केला आहे. त्यानंतर आता कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.

प्रत्येक दोन मिनिटांनी फेरी (Time Between 2 Pod Taxi is 2 Minutes)

या पॉड टॅक्सीसाठी फक्त २ मिनिटे वाट पाहावी लागणार आहे. प्रत्येक दोन मिनिटांनी पॉड टॅक्सी प्रवाशांसाठी येणार आहे. दोन पॉड टॅक्सीमधील कालावधी दोन मिनिटांचा असणार आहे. या पॉड टॅक्सीमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेची काळझी घेण्यात आली आह. यामध्ये धडक टाळण्यासाठी अॅन्टी कोलिजन सिस्टीम बसवण्यात आली आहे.

ऑनलाइन तिकीट काढता येणार

या पॉड टॅक्सीचे तिकीट तुम्हाला ऑनलाइन काढता येणार आहे. यासाठी तुम्हाला मोबाईल अॅप उलब्ध करुन देणार आहेत.

पॉड टॅक्सीविषयीची माहिती (Pod Taxi information)

  • एकूण अंतर- ३३ किमी

  • स्थानके- १६ स्टेशन

  • खर्च- १,००० कोटी

  • प्रवाशांची क्षमता- १६

  • किमान शुल्क-२६ रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: माढा-वैराग मार्गावरील सीना नदीवरील पूल पाण्याखाली,वाहतुक बंद

Beed : मुलगा खूप शिकलाय, पण आरक्षणामुळे नोकरी लागत नाही; बंजारा समाजातील ऊसतोड कामगाराने आयुष्य संपवलं

Dhule News : बंद पाकिटातील बिस्किटावर बुरशी आणि अळ्या; कुठे घडला संतापजनक प्रकार?

Panvel Tourism : तलावाकाठी येईल चौपाटीवर फिरण्याचा फिल, पनवेलजवळील निसर्गरम्य ठिकाण

Asia Cup 2025: पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर; यूएईविरुद्ध सामना खेळण्यास नकार, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT