Ravindra Waikar Vs Amol Kirtikar Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai North West: मोठी बातमी! रविंद्र वायकर यांच्या मेहुण्याविरोधात गुन्हा दाखल; निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यानेच मोबाईल पुरवल्याचे उघड

Mumbai North West Loksabha Election: मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या निकालाविरोधात अमोल किर्तीकर यांनी निवडणूक आयोगात धाव घेतली आहे.

Gangappa Pujari

संजय गडदे| मुंबई, ता. १५ जून २०२४

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर यांना पराभव स्विकारावा लागला. अमोल किर्तीकरांचा शिवसेना शिंदे गटाच्या रविंद्र वायकर यांनी अवघ्या ४४ मतांनी पराभव केला.

या निकालाविरोधात अमोल किर्तीकर यांनी निवडणूक आयोगात धाव घेतली आहे. याप्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली असून मतमोजणी कक्षात मोबाईल वापरल्याप्रकरणी वायकर यांच्या मेहुण्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. मतमोजणी केंद्रात मोबाईल वापरण्याची बंदी असताना शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर यांच्या नातेवाईकांनी मोबाईल वापरल्याचा आरोप भरत शाह आणि सुरेंद्र अरोरा या अपक्ष उमेदवारांनी केला होता.

याप्रकरणी निवडणूक अधिकारी व पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. याबाबत आता मोठी अपडेट समोर आली असून रविंद्र वायकर यांचा मेहुणा मंगेश पंडीलकर याने मोबाईल वापरल्याचे उघड झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यानेच पंडीलकरला फोन पुरवल्याचे उघड झाले आहे.

दिनेश गुरव हा निवडणूक आयोगाचा एनकोर ऑपरेटर असून त्याने वायकर यांचा मेहुणा मंगेश पंडीलकर याला मोबाईल दिल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी वनराई पोलिसात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या तक्रारीनंतर भादवि कलम 188 नुसार गुरव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Movie Teaser: 'अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?'; निर्मिती सावंत - प्रार्थना बेहेरे उलगडणार सासू-सुनेचं खट्याळ नातं, पाहा VIDEO

Tamarind Pickle Recipe : आंबट गोड चिंचेचे लोणचे, पाहताच क्षणी तोंडाला पाणी सुटेल

Post Office Scheme: पोस्टाच्या या योजनेतून दर महिन्याला मिळतील २०,००० रुपये; किती गुंतवणूक करायची? वाचा कॅल्क्युलेशन

Maharashtra Live News Update: राज ठाकरेंच्या भेटीला संजय राऊत, मनपा निवडणुकीवर होणार चर्चा

Famous Singer : मुलगा झाला हो! मराठमोळी गायिका झाली आई, पाहा PHOTOS

SCROLL FOR NEXT