youth protest in mantralaya Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Mantralaya News: शिक्षक भरतीसाठी तरुणाचे मंत्रालयात आंदोलन, सुरक्षा जाळीवर मारली उडी

Man Jumped On Safety Net In Mantralaya: पोलिसांनी (Mumbai Police) सुरक्षा जाळीवर उडी मारून या तरूणाला ताब्यात घेतले.

Priya More

Mumbai News:

शिक्षक भरती (Teacher Recruitment) करावी या मागणीसाठी तरुणाने मुंबईतल्या मंत्रालयामध्ये (Mantralaya) आंदोलन केले. या तरुणाने थेट मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर उडी मारून आंदोलन केले. यावेळी या तरुणाने जोरदार घोषणाबाजी देखील केल्या. पोलिसांनी (Mumbai Police) सुरक्षा जाळीवर उडी मारून या तरूणाला ताब्यात घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षक भरती करावी या मागणीसाठी बीडच्या आंबाजोगाई येथून आलेल्या तरुणाने मंत्रालयात आज आंदोलन केले. लवकरात लवकर शिक्षक भरती करण्यात यावी अशी मागणी या तरुणाने केली आहे. हा तरुण उसतोड कामगार आणि प्रकल्पग्रस्त असल्याने असल्याचे सांगितले जात आहे.

या तरुणाने सुरक्षा जाळीवर उडी मारल्यानंतर मंत्रालयामध्ये एकच गोंधळ उडाला. त्यानंतर मंत्रालयातील पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सुरक्षा जाळीवर उडी मारत या तरुणाला बाहेर काढले. त्यानंतर पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले.

दरम्यान, मागच्या महिन्यामध्ये मंत्रालयामध्ये अप्पर वर्धा धरणग्रस्त शेतकऱ्यांनी अशाचप्रकारचे आंदोलन केले होते. या शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत विविध मागण्यांसाठी थेट मंत्रालयतील सुरक्षा जाळीवर उडी मारली होती. त्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं. हे सर्व आंदोलक शेतकरी अमरावती येथील होते.

अप्पर वर्धा धरणग्रस्तांचा प्रश्न गेल्या ४० वर्षांपासून प्रलंबित आहे. सरकारकडून त्यांच्या आंदोलनाची दखल घेत नसल्यामुळे या शेतकऱ्यांनी आक्रमक होत मंत्रालयात आंदोलन केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail color change: नखांचा रंग निळा पडत असेल तर 'हे' आजार असू शकतात; लक्षणं दिसताच डॉक्टरांकडे घ्या धाव

IPL 2026 Points Table: मुंबईच्या पराभवाने पॉईंट्स टेबलमध्ये मोठा बदल, पाहा कोण कुठल्या क्रमांकावर?

Homemade Hair Straightening Tips: हेअर स्ट्रेटनिंगसाठी पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही! घरगुती कोरफड आणि अंड्याचा हेअर मास्क ठरेल फायदेशीर, कसा वापरायचा? जाणून घ्या

Oral cancer: तंबाखूचं सेवन न करणाऱ्यांमध्येही तोंडाचा कॅन्सर वाढतोय, महिलांसाठी ही धोक्याची घंटा का ठरतेय?

भाजप नेत्याच्या पुतण्याची भररस्त्यात गोळी झाडून हत्या, मेहुणा गंभीर; आरोपीचा पोलिसांकडून एन्काउंटर

SCROLL FOR NEXT