Mumbai Dam Water Level Today Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Dam Water Level: मुंबईला पाणीपुरवठा करणारी ५ धरणं काठोकाठ भरली, वाचा पाणीसाठ्याची ताजी आकडेवारी

Mumbai Rain And Dam Water Level Update: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात असाच पाऊस सुरू राहिला तर येत्या काही दिवसांत जलाशयांमधील पाणीसाठ्यात वाढ होऊन १०० टक्क्यांवर पोहचेल. ७ जलाशयांपैकी ५ जलाशये ओव्हर फ्लो झाली आहेत.

Priya More

मुंबईल पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली असून यामधील ५ धरणं काठोकाठ भरली आहेत. सातही जलाशयांमधील पाणीसाठा ९० टक्क्यांवर पोहचला आहे. धरणक्षेत्रात असाच पाऊस सुरू राहिला तर येत्या काही दिवसांत जलाशयांमधील पाणीसाठ्यात वाढ होऊन १०० टक्क्यांवर पोहचेल. ७ जलाशयांपैकी ५ जलाशये ओव्हर फ्लो झाली आहेत. आता मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. या धरणांमध्ये आजच्या तारखेपर्यंत किती पाणीसाठा जमा झाला हे आपण जाणून घेणार आहोत...

मुंबई महानगर पालिकेने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठा ९० टक्क्यांपेक्षा जास्त झाला आहे. ७ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठा १३,०५,९४८ दशलक्ष लिटर इतका झाला. म्हणजेच या धरणांमध्ये एकूण ९०.२३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मागच्या वर्षी याच दिवशी या धरणांमध्ये ११,७२,९६७ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा होता. म्हणजेच ८१.०४ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. मागच्यावर्षीच्या तुलनेत आजच्या दिवशी सातही धरणातील पाणीसाठा ९ टक्क्यांनी वाढला आहे.

मुंबई शहर आणि उपनगराला ७ जलाशयांमधून पाणीपुरवठा केला जातो. अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या ७ जलाशयांमधून मुंबईला पाणी पुरवठा केला जातो. यामध्ये ५ धरण आणि २ तलाव आहेत. यासातही धरण आणि तलाव क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. यामधील तुलसी, विहार, मोडक सागर, मध्य वैतरणा आणि तानसा ही जलाशये ओव्हर फ्लो झाली आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या या सातही धरणांमध्ये १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. या धरणांमधून मुंबईला दिवसाला ३ हजार दशलक्ष लिटर पाणीपुरववठा केला जातो.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठा -

- अप्पर वैतरणा - ८०.१४ टक्के पाणीसाठा

- मोडक सागर - १०० टक्के पाणीसाठा.

- तानसा - ९९.३० टक्के पाणीसाठा.

- मध्य वैतरणा - ९६.०१ टक्के पाणीसाठा

- भातसा - ८७.७९ टक्के पाणीसाठा.

- विहार - १०० टक्के पाणीसाठा.

- तुलसी - १०० टक्के पाणीसाठा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs: 'या' 5 राशींना पावणार विठुराया; संकटं दूर होतील घरात येईल लक्ष्मी

Maharashtra Live News Update: CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पंढरपुरात आरोग्यवारी सोहळा

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

SCROLL FOR NEXT