Arnala Fort  x
मुंबई/पुणे

Mumbai : बेपत्ता जोडप्याचा अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर मृतदेह आढळला; संशयास्पद मृत्यू, अपघात की घातपात?

Arnala Fort Mumbai: अर्नाळा किल्ला समुद्रकिनाऱ्यावरच्या खारफुटीच्या जंगलांमध्ये दोन मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली. या मृतदेहांची ओळख पटली आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

Yash Shirke

मुंबई : विरारच्या अर्नाळा किल्ला परिसरातून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अर्नाळा किल्ला येथील समुद्रकिनाऱ्यावरील निर्जन खारफुटीच्या जंगलात दोन अनोळखी मृतदेह आढळून आले. त्यानंतर याबाबतची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. तात्काळ घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. बेपत्ता झालेल्या जोडप्याचे हे मृतदेह असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (२९ जून रोजी) अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावरच्या खारफुटीच्या जंगलांमध्ये एक महिला आणि एक पुरुष असे दोन मृतदेह आढळले. स्थानिक नागरिकांना मृतदेहांबाबत पोलिसांनी कळवले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि दोन्ही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले.

चौकशीदरम्यान दोन्ही मृतदेहांची ओळख पटली. शिवाजी शिंदे (वय ५१) व त्यांची पत्नी रंगीता शिंदे (वय ४८) असे मृतांचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे यांच्या कुटुंबियांनी त्यांची बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.पोलिसांनी दोन्ही मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या हवाली केले. शिंदे दांपत्य विरारचे रहिवासी असल्याचे तपासात उघड झाले.

शिवाजी शिंदे आणि त्यांची पत्नी रंगीता शिंदे या दोघांचा मृत्यू पाण्यात बुडून झाला. पण हा अपघात होता, की घातपात याचा शोध सुरु असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे. दोघांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता का याचाही तपास पोलीस करत आहेत. शिंदे यांना २१ वर्षांची मुलगी आहे. शनिवारी रात्री शिंदे दांपत्याचे त्यांच्या मुलीशी संवाद झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Idol Dahi Handi 2025 : महिला, अंध व दिव्यांग गोविंदांसाठी दादरमध्ये अनोखी दहीहंडी|VIDEO

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर

रात्री आक्रित घडलं; संततधारेमुळे भिंत खचली, गाढ झोपेत वृद्ध दाम्पत्यांच्या अंगावर पडली; जागीच मृत्यू

Maharashtra Politics : "ठाकरे बंधू एकत्र यावेत ही लोकांची इच्छा" माजी आमदार वैभव नाईकांनी दिले ठाकरे बंधूंच्या एकीचे संकेत

Mumbai Dahi Handi History: मुंबईत कधीपासून सुरू झाला दहीहंडी उत्सव, 100 वर्षाचा जुना इतिहास

SCROLL FOR NEXT