Unclaimed Bag Found Outside Minister Nitesh Rane House Saam Tv
मुंबई/पुणे

Nitesh Rane: नितेश राणे यांच्या शासकीय बंगल्याबाहेर सापडली बेवारस बॅग, सीसीटीव्ही VIDEO समोर

Unclaimed Bag Found Outside Minister Nitesh Rane House: मंत्री नितेश राणे यांच्या मुंबईतील शासकीय बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू केला आहे. बॉम्ब शोधक पथकाकडून बॅगची तपासणी सुरू आहे.

Priya More

Summary -

  • नितेश राणे यांच्या शासकीय बंगल्याबाहेर बेवारस बॅग आढळली

  • परिसरात भीतीचे वातावरण आहे

  • पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

  • बॉम्ब शोधक पथकाकडून बॅगची तपासणी सुरू

  • सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे

हिंदुत्वाची आक्रमक भूमिका मांडणाऱ्या मंत्री नितेश राणेंच्या घराबाहेर बेवारस बॅग सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली. नितेश राणे यांचे मुंबईतील शासकीय निवासस्थान असलेल्या 'सुवर्ण गड' बंगल्याबाहेर ही बेवारस बॅग सापडली. त्यांच्या बंगल्याशेजारीच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे बाळासाहेब भवन आहे. तर मंत्री जयकुमार गोरे यांचा बंगला देखील तिथेच आहे. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांकडून सध्या तपासणी सुरू आहे.

मंत्री नितेश राणे यांच्या घराबाहेर बेवारस बॅग सापडल्यामुळे हा घातपाताचा प्रयत्न आहे की काय? अशा प्रकारची चर्चा सुरू झाली आहे. बॉम्ब शोधक पथकाकडून बॅगची तपासणी सुरू आहे. घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात आहे. याठिकाणी येण्या-जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे.

या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये ब्राऊन कलरचा टी-शर्ट, ब्लॅक कलरचे जॅकेट आणि पँट घातलेला एक तरुण हातामध्ये ब्लॅक कलरची ट्रॉली बॅग घेऊन येताना दिसत आहे. हा तरुण नितेश राणे यांच्या बंगल्याजवळ येतो आणि तो त्याठिकाणी ही बॅग सोडून निघून जातो. बॅगसोबत एक चिठ्ठी ठेवण्यात आली आहे. बॅगमध्ये ठेवलेले बूट आणि कपडे हे तुम्ही घेऊ शकता असे या चिठ्ठीत लिहिले आहे.

मागील काही दिवसापासून नितेश राणे आक्रमकपणे हिंदुत्वाची भूमिका मांडत आहेत. नितेश राणेंची आज छत्रपती संभाजी नगरमध्ये जाहीर सभा होणार आहे. त्यापूर्वीच त्यांच्या बंगल्याबाहेर ही बेवारस बॅग सापडली. मंत्र्यांच्या शासकीय बंगल्याबाहेर अशाप्रकारे बेवारस बॅग ठेवल्याच्या घटना होत असतील तर ही अतिशय गंभीर बाब आहे. पोलिस सध्या सीसीटीव्ही व्हिडीओद्वारे त्यामध्ये दिसणारी व्यक्ती कोण आहे? याचा शोध घेत आहे. ही बॅग त्याने इथे का आणून ठेवली? याचा देखील पोलिस तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Morning Yoga Exercise: फिट राहण्यासाठी सकाळी करा फक्त ही 5 योगा

Konkan Kanya Express: कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! आता सीट पक्कीच समजा; ‘कोकणकन्या-मांडवी’ला जादा डबे

Nashik News: नरहरी झिरवाळांच्या मतदारसंघात ACB ची मोठी कारवाई, महिला सरपंचाला लाच घेताना रंगेहाथ पकडलं

Maharashtra Live News Update: मंत्री नरहरी झिरवळांच्या मतदारसंघात एसीबीची मोठी कारवाई

Success Story: मल्टी नॅशनल कंपनीतील नोकरी सोडली, UPSC परीक्षेची तयारी केली, तिसऱ्या प्रयत्नात मिळवले यश; IAS अभिषेक शर्मा यांचा प्रवास

SCROLL FOR NEXT