Nitesh Rane: निलेश-नितेशमध्ये शीतयुद्ध? राणे कुटुंबात अंतर्गत वाद की 'ऑल इज वेल'?नितेश राणेंचा मोठा खुलासा

Nitesh Rane Breaks Silence on Family Conflict : मुंबईचा महापौर हा हिंदू होणार असल्याचं म्हणत भाजप नेते नितेश राणे यांनी कुटुंबातील अंतर्गत कलहाबद्दल ही मोठा खुलासा केलाय. साम टीव्हीच्या ब्लॅक अॅण्ड व्हाईट या मुलाखतीच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी कोकणाचा विकास करणाऱ्या रेल्वे मार्गावर भाष्य केलं. राणे कुटुंबातील जिव्हाळा, दोन भावांमधील नातं आणि मुंबई महानगरपालिकेवर नितेश राणेंनी रोखठोक उत्तरे दिली.
Nitesh Rane: निलेश-नितेशमध्ये शीतयुद्ध? राणे कुटुंबात अंतर्गत वाद की 'ऑल इज वेल'?नितेश राणेंचा मोठा खुलासा
Published On
Summary
  • राणे कुटुंबात अंतर्गत वाद असल्याची जोरदार चर्चा

  • नारायण राणेंच्या निवृत्तीच्या उल्लेखामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं

  • नितेश राणेंनी चर्चांवर प्रतिक्रिया देत परिस्थिती स्पष्ट करण्याचा प्रयत्न

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणातील सर्वाधिक चर्चेत राहणारं राणे कुटुंबात आलबेल नसल्याची चर्चा सुरूय. दोन्ही निलेश आणि नितेश राणे या दोन्ही भावांमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याचं म्हटलं जात आहे. त्याचदरम्यान नारायण राणेंनी आपण राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचं म्हटलं. त्यावरून राणे कुटुंबात सर्वकाही ठीक नसल्याचं म्हटलं जातंय. खरंच राणे कुटुंबात वादाची ठिणगी पडलीय का? दोन्ही भावांमध्ये फुट पडलीय का? अशा प्रश्नांवर भाजप नेते नितेश राणे यांनी सामच्या ब्लॅक अॅण्ड व्हाइट कार्यक्रमात उत्तरं दिलं.

नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकीच्याकाळात नितेश राणे आणि निलेश राणे यांच्या वाद संघर्ष पेटल्याचं दिसलं होतं.त्यावर नितेश राणे यांनी ब्लॅक अॅण्ड व्हाईट कार्यक्रमात मोठा खुलासा केला. दोन्ही भावांमध्ये कोणताही वाद नाही. नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढत होते.त्यामुळे तेथे नितेशविरुद्ध निलेश असा संघर्ष नव्हता. तर भाजप विरुद्ध शिवसेना असा संघर्ष होता.

...तरी आरोप झाला असता

निलेश राणे हे शिवसेना पक्षाचे काम करत होते. ते त्यांच्या पक्षाचे काम करत होते. तर मी भाजपची भूमिका मांडत होतो. भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. जर मी निलेश राणेंची किंवा शिवसेनेची बाजू घेतली असती किंवा निलेश राणे यांनी भाजपची बाजू घेतली असती तर आरोप झाले असते. तसेच नारायण राणे यांनी आणि मी शिवसेनेची बाजू घेतली असती किंवा निलेश राणेंची बाजू घेतली असती तरी आरोप झाले असते. यात झालं काय आमच्या दोघांच्या वादात ज्यांना राजकीय पोळी भाजून घ्यायची होती त्यांनी ती पोळी भाजून घेतली. पण मुळात आमच्या दोन्ही भावांमध्ये कोणताच वाद नाही असा खुलासा नितेश राणे यांनी केलाय.

हिंदुत्त्वाची विचारधारा का घेतली?

हिंदुत्वाची भूमिका परखडपणे मांडण्याबाबत आणि कठोर हिंदुत्वाचा चेहरा म्हणून नितेश राणे ओळखले जातात. त्याबाबात नितेश राणे म्हणाले, हिंदुत्त्वाची विचारधारा ही आपली मूळ विचारधारा आहे. कारण हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. तर राष्ट्रवर प्रेम करणारा प्रत्येक हिंदू हा राष्ट्राचा भाग आहे, असा विचार करून आपण पुढे जातो सर्वच प्रश्न सुटत असतात.

कोणताही मंत्री होण्याआधी आणि कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता होण्याआधी आम्ही एक हिंदू आहोत. कोणत्या पदावर काम करणं असो, कोणत्याही व्यवसाय करणं असो की कोणत्याही खुर्चीवर बसणं असो, त्याआधी आम्ही हिंदू आहोत. हिंदू ही आमची ओळख आहे.आमच्या जन्म आणि मृत्यू पुत्रिकेवर आम्ही हिंदू म्हणून ओळख लिहित असतो.इतर कोणत्याही गोष्टी लिहित नाही ना कोणते पद लिहित नाही. हाच विचार घेऊन आम्ही पुढे चालत आहोत.

समाजातील जातपात मिटवण्यासाठी हिंदू धर्म महत्त्वाचा

हिंदू या शब्दात खूप मोठी ताकद आहे. समाजातील जात घालवण्यासाठी हिंदू म्हणून एकत्र येणं खूप महत्त्वाचं आहे. जात घाल समाजातील जातपात जात नाही, असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळी आपण मुस्लीम समाजाकडे पाहिलं पाहिजे. मुस्लीम समाजात सुद्धा अनेक जातीपाती आहेत. पण जेव्हा ते जातींचा उल्लेख करत नाहीत तर ते मुस्लीम आरक्षण द्या असं म्हणतात. आपल्या शेजारी अनेक धर्माचे लोक असतात. त्यावेळी ते त्यांच्या धर्मातील जातीचं उल्लेख करत नाहीत. त्याचप्रमाणे आपणही जातीचा उल्लेख न करता हिंदू म्हणून एक आलं पाहिजे.

धार्मिक कार्यक्रमाच्या नावाने धर्मांतर सुरू- नितेश राणे

धर्मांतराचे प्रकरणं वाढत आहेत. अनेक आदिवासी भागात धर्मांतर होत आहेत. नंदुरबार, गडचिरोली आणि पालघर, मालवणमध्ये धर्मांतराचे अनेक प्रकार घडत आहेत. धर्मांतर होऊ नये म्हणून हिंदू समाजाने जागृत राहणं आवश्यक आहे. मालवण मध्ये कॅथेलिक समाजाचे लोकांकडून धर्मांतराचे प्रकार घडवले जात आहेत. ते धार्मिक कार्यक्रमाच्या नावाने धर्मांतर घडवून आणतात. धार्मिक कार्यक्रमाला वरती साई बाबाचे नाव देतात. आणि आत धर्मांतराचे काम केलं जातं. त्र्यंबकेश्वरमध्ये अनेक अशी दुकाने आहेत, ज्यावर जय श्रीराम नाव लिहिले असेल पण आत दुकानात अब्दुल बसलेला असतो, त्यामुळे हिंदूंनीच त्याबाबत जागृत राहणं आवश्यक आहे.आपण कोणाकडून काय घेतोय काय खरेदी करतोय हे लक्षात घेतलं पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com