Nitesh Rane : 'उद्धव ठाकरे वेड्यांचे पक्षप्रमुख'; आमदार नितेश राणेंचा घणाघात, शिवसैनिक आक्रमक

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नितेश राणे यांनी जहरी टीका केली आहे.
Nitesh Rane
Nitesh Rane Saam TV
Published On

Nitesh Rane : राणे आणि ठाकरे वाद पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता दिसत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नितेश राणे यांनी जहरी टीका केली आहे. ठाकरे गट म्हणजे दोस्ताना पार्ट ३ आहे तसेच उद्धव ठाकरे वेड्यांचे पक्षप्रमुख असल्याचे खोचक वक्तव्य भाजप नेते नितेश राणे यांनी केले आहे. (Latest Nitesh Rane News)

नितेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना ही टीका केली आहे. यावेळी त्यांनी कोणतंही ताळतम्य न बाळगता भाष्य केलं आहे. ठाकरे गटाच्या नेत्यांवर निशाणा साधताना त्यांनी संजय राऊतांवर देखील घणाघात केला. ते म्हणाले की, " संजय राऊत यांचा वरचा भाग सटकलेला आहे. राज्यात जिथे कुठे वेड्यांच रुग्णालय असेल त्याचा शोध घ्या आणि संजय राऊतांना तिकडे ठेवा. यांची ३१ डिसेंबरची पार्टी वेड्यांच्या दवाखान्यातच व्हायला हवी. "

"उद्धव ठाकरे यांचा ग्रुप वाटी एवढा राहीला आहे. त्यामुळे त्यांनी हट्ट सोडावा. तसेच शिवसेनेचं कार्यालय बाळासाहेब ठाकरेंच आहे. त्यामुळे त्याचा हक्क शिंदे देखील घेणारच. बाळासाहेब जिथे बसत होते तिथे आता शिंदेंचा अधिकार आहे. ", असे राणे म्हणाले.

Nitesh Rane
Nitesh Rane : संघाच्या रेशीमबागेत नितेश राणे शांतच दिसले; संवाद न साधताच निघून गेले, नेमंक काय घडलं?

पुढे नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली. बाळासाहेबांच्या प्रत्येक जागेवर शिंदेंचाच अधिकार असल्याचे त्यांनी म्हटले. " शिंदेना बाळासाहेबांच्या जागेवर मान दिल्याने उद्धव ठाकरे काय बॉम्ब फोडणार आहेत. ते फक्त पॅंन्टीतसे बॉम्ब राहीलेत. त्यांच्या मनगटात तेवढी ताकत नाही, अशी खालच्या शब्दांत टीका राणेंकडून करण्यात आली आहे. यामुळे आता पुन्हा एकदा राणे आणि ठाकरे वाद चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com