Oshiwara Mall Fire Saam Tv
मुंबई/पुणे

Oshiwara Mall Fire: ओशिवरा मॉलला लागलेली आग विझवण्यासाठी गेलेले तीन जवान जखमी

Mumbai News: ओशिवरा मॉलला लागलेली आग विझवण्यासाठी गेलेले तीन जवान जखमी

Satish Kengar

>> संजय गडदे

Oshiwara Mall Fire:

मुंबईतील ओशिवरा येथील हीरा पन्ना मला आज दुपारी आग लागल्याची घटना घडली. या मॉलमध्ये लागलेली आग विझवण्यासाठी गेलेल्या मुंबई अग्निशमन दलाच्या तीन जवानांना प्रचंड धुरांच्या लोटा मुळे श्वास घेण्यास त्रास झाला यातच ते जखमी देखील झाले.

रुग्णवाहिकेच्या सहाय्याने या तीनही जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या तिघांचीही प्रकृती आता स्थिर असल्याचं रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

संदीप मारुती पाटील, राजू उत्तम शिंगणकर आणि योगेश कोंडावार अशी धुरामुळे श्वास कोंडून जखमी झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांची नावे आहेत. (Latest Marathi News)

आज दुपारच्या सुमारास जोगेश्वरी भागातील हिरा पन्ना मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली. मॉल काच बंद असल्यामुळे आग विझवण्यास अग्निशमन दलाला मोठे शर्तीचे प्रयत्न करावे लागले. अशातच मॉलमध्ये अडकलेल्या 20 पेक्षा अधिक नागरिकांना बाहेर काढत असताना अग्निशमन दलाच्या दुसऱ्या मजल्यावर आणि छतावर जाऊन सर्व नागरिकांची सुटका केली.

मात्र धुरांच्या प्रचंड लोटामुळे आणि संबंधाच्या जवानांना श्वास घेण्यास त्रास झाल्यामुळे ते जखमी झाले. या सर्व जखमी जवानांना महापालिकेच्या कूपर रुग्णालय, ट्रॉमा केअर रुग्णालय आणि कोकिलाबेन अंबानी रुग्णालय येथे विचारासाठी दाखल केले. या सर्वांचे प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून देखील सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट

Pratapgad Fort : मराठ्यांच्या पराक्रमाचा अजरामर इतिहास, प्रतापगड किल्ल्याचे जुने नाव काय?

Medicine Price Drops : दिलासादायक! BP, शुगर अन् डायबिटीजच्या गोळ्या झाल्या स्वस्त

Petrol Diesel Price : पेट्रोल-डीझेलचे नवे दर जारी, घराबाहेर पडण्याआधी एकदा चेक कराच

Bhandardara Tourism: हिल स्टेशन नंतर फिरा; या विकेंडला भंडारदऱ्याला काजवा महोत्सव आवर्जून पाहून या

SCROLL FOR NEXT