Mumbai News  Saam Tv
मुंबई/पुणे

Vasai - Virar : कर्मचाऱ्यांना पगार नाही, वसई-विरार मनपाची बससेवा ठप्प; ऐन गणेशोत्सवात नागरिकांना मनस्ताप

Mumbai News : वसई-विरार महानगरपालिकेच्या परिवहन कर्मचाऱ्यांना पगार न मिळाल्याच्या निषेधार्थ बस सेवा ठप्प झाली आहे. गणपती उत्सवाच्या तोंडावर बससेवा बंद राहिल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

Alisha Khedekar

  • पगार न मिळाल्याने वसई-विरार बससेवा ठप्प

  • ३६ मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे बंद

  • प्रवाशांना दुप्पट खर्च करून प्रवास

  • गणपती उत्सवापूर्वीच वाहतूक कोंडीची शक्यता वाढली

वसई-विरार शहर महानगरपालिकेची परिवहन सेवा आज सकाळपासून पूर्णपणे ठप्प झाली असून, यामुळे शहरातील प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत. गणपती उत्सव अगदी दारात आला असतानाही चालक आणि कंडक्टर यांना अद्याप पगार न मिळाल्याने त्यांनी काम बंद आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पालिकेच्या ठेकेदाराने अनेक दिवसांपासून पगार देण्यास टाळाटाळ केली असून, वारंवार मागणी करूनही काही प्रतिसाद मिळालेला नाही.

पालिका क्षेत्रात ३६ मार्गांवर परिवहन सेवा चालवली जात होती. या बससेवेमुळे वसई-विरार आणि परिसरातील नागरिक, शालेय विद्यार्थी, तसेच रोजंदारीवर काम करणारे चाकरमानी मोठ्या प्रमाणात प्रवास करत होते. मात्र, आज सकाळपासूनच सेवा अचानक बंद झाल्यामुळे प्रवाशांची एकच धावपळ उडाली. बसस्थानकांवर रिकाम्या जागा, थांब्यांवर बसची प्रतीक्षा करणारे प्रवासी, तसेच बसऐवजी रिक्षा आणि खाजगी वाहनांचा आधार घेत असलेले लोक असे दृश्य सर्वत्र दिसत होते. रिक्षा भाड्यात झालेली अचानक वाढही प्रवाशांच्या अडचणीत भर घालत आहे.

चालक आणि कंडक्टर यांचे म्हणणे आहे की, जोपर्यंत पगार दिला जात नाही तोपर्यंत सेवा पुन्हा सुरू केली जाणार नाही. “महिन्याचा शेवट होतो आहे, घरखर्च, मुलांचे शिक्षण, कर्जाचे हप्ते या सर्व गोष्टींसाठी पगार आवश्यक आहे. पण ठेकेदाराकडून फक्त आश्वासने मिळत आहेत. त्यामुळे आता आमच्याकडे काम बंद करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही,” असे एका चालकाने सांगितले.

पालिकेकडून अद्याप या आंदोलनाबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराशी चर्चा सुरू केली असून, तातडीने पगार दिला जावा यासाठी दबाव आणला जात आहे. याचबरोबर, गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बससेवा ठप्प राहिल्यास शहरातील वाहतूक व्यवस्थेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, प्रवाशांनीही या परिस्थितीवर नाराजी व्यक्त केली आहे. “बससेवा बंद असल्याने आम्हाला दुप्पट भाडे देऊन प्रवास करावा लागतो आहे. एवढेच नव्हे तर रिक्षा आणि टॅक्सी मिळवण्यासाठीही दीर्घ प्रतीक्षा करावी लागत आहे. पालिकेने आणि ठेकेदाराने तातडीने तोडगा काढावा,” अशी मागणी नागरिक करत आहेत. ही परिस्थिती लांबली, तर केवळ प्रवाशांचेच नव्हे तर वाहतूक व्यवस्थेचे आणि शहरातील दैनंदिन कामकाजाचे मोठे नुकसान होईल, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

वसई-विरार बससेवा का ठप्प झाली आहे?

चालक आणि कंडक्टर यांना ठेकेदाराकडून पगार न मिळाल्यामुळे त्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

किती मार्गांवरील सेवा बंद आहे?

एकूण ३६ मार्गांवरील बससेवा पूर्णपणे ठप्प आहे.

प्रवाशांवर याचा कसा परिणाम झाला?

प्रवाशांना दुप्पट भाडे देऊन रिक्षा किंवा खाजगी वाहनांचा वापर करावा लागत आहे.

पुढील पाऊल काय असू शकते?

पगार दिला जाईपर्यंत सेवा सुरू न करण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kamali: कमळी मालिकेत नवा ट्विस्ट; थिएटरमध्ये कमळीची छेड काढल्यामुळे ऋषीचा संताप अनावर, दोघांच्या नात्याला मिळणार नये वळण

Voter List Scam: महाराष्ट्र, कर्नाटकानंतर केरळातही घोळ; एकाच पत्त्यावर ९ जणांची बनावट मतदार नोंदणी

Maharashtra Live News Update: नागपूर शहरातील काही भागात पावसाला सरीना सुरूवात

Cabinate Decision: रेशन दुकानदारांना आता क्विंटलमागे १७० रुपये मार्जिन; राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय, पाहा, VIDEO

Voter List Scam : दोनच मतदार असताना एकाच घरात दाखवले ११९ मतदार; चंद्रपूर जिल्ह्यातील मतदार यादीतील घोटाळा उघड

SCROLL FOR NEXT