Uddhav Thackeray News  Saam tv
मुंबई/पुणे

Video : उद्धव ठाकरेंचे भाषण पाहून शिवसैनिकांना झाली बाळासाहेबांची आठवण; भाषणाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना कलानगर येथील चौकात खुल्या कारमधून शिवसैनिकांना संबोधित केले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Uddhav Thackeray News : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना कलानगर येथील चौकात खुल्या कारमधून शिवसैनिकांना संबोधित केले. या भाषणाने तब्बल 54 वर्षांनंतर बाळासाहेबांच्या त्या भाषणाची आठवण आजच्या या भाषणाने करुन दिली. आजची राजकीय स्थिती तर सगळ्यांना माहीत आहेच. तर बाळासाहेबांनी फियाटवर उभं राहून तेव्हा का भाषण केलं होतं. त्यामुळे उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या शैलीतील भाषणाने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. (Latest Marathi News)

शिवसेना पक्षाचं नाव, चिन्ह गमावल्यानंतर पुढची लढाई कोणत्या मार्गाने लढायची,सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोगासमोर कशी दाद मागायची यापेक्षाही अवसान गळालेल्या शिवसैनिकांमध्ये उत्साह कसा भरता येईल, हे मोठं आव्हान उद्धव ठाकरेंसमोर आहे. पुढील रणनीती काय हे ठरवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी कलानगर चौकात खुल्या कारमधून भाषण केलं.

या भाषणात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे म्हणाले, 'धनुष्यबाण चोरणारे मर्द असतील. तुम्ही धनुष्यबाण घेऊन या.. मी मशाल घेऊन येतो. बघू काय होते. धनुष्यबाण पेलायला मर्द लागतो. रावणानेही शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला उताणा पडला. या चोरांनाही पेलता येणार नाही. हे मी सांगतो'.

'मी खचलो नाही. खचणार नाही. तुमच्या ताकदीवर मी उभा आहे. जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत चोर आणि चोरबाजारांच्या मालकांना गाडून आपण त्याच्या छाताडावर उभा राहील, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला. कार्यकर्त्यांना संबोधन करताना उद्धव ठाकरेंनी खुल्या कारमधून बाहेर येत भाषण केलं.

शिवसैनिकांना झाली बाळासाहेबांच्या 'त्या' भाषणाची आठवण

दरम्यान, आजचे भाषण पाहून शिवसैनिकांना 1969 मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी केलेल्या भाषणची आठवण झाली. तेव्हा बेळगाव सीमाप्रश्न पेटला होता. 1969 मध्ये पुकारलेलं सीमा आंदोलन शिवसेनेच्या इतिहासात कोरलं गेलंय.

17 जानेवारी हा दिवस सीमाभागात काळा दिवस म्हणून पाळला जातो. त्या दिवशी बेळगावमध्ये सभाबंदी लादली जाते. ती मोडून बाळासाहेब ठाकरे यांनी त्या वर्षी बेळगावमध्ये सभा घेतली. या सभेत सीमाप्रश्न सोडविण्यासाठी निर्वाणीचे आंदोलन पुकारल्याचे जाहीर केले. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री मोरारजी देसाई मुंबईत (Mumbai) भेटीसाठी येणार होते

सीमाप्रश्नाबाबत निवेदन देण्यासाठी शिवसेनेचे नेते माहीम येथे जमा झाले होते. मात्र मोरारजींची गाडी न थांबता सरळ भरधाव निघून गेली.

संतप्त झालेल्या बाळासाहेबांनी मोटारीवर उभे राहून भाषण केले, बजावले की,आता माघार नाही! बाळासाहेबांन तिथेच अटक झाली आणि मुंबई पेटली! त्यानंतर शिवसेनाप्रमुख 100 दिवस तुरुंगात होते.

प्रसंग जुना पण आज शिवसेनेवर ओढावलेले वेळ सैनिकांना 54 वर्ष मागे घेऊन गेली. बाळासाहेबांनी देखील एकेकाळी गाडीच्या टपावर उभं राहून भाषण केलं. त्या भाषणावरून शिवसैनिकांना बाळासाहेबांची आठवण आली. त्यात आज उद्धव ठाकरेंनी पक्षाचं नावं,चिन्ह गमवल्यानंतर गाडीवरून भाषण केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT