Shivsena Vardhapan Din Saam Tv
मुंबई/पुणे

VIDEO : वर्धापनदिनाआधीच ठाकरे- शिंदेंमध्ये सामना! 'आमची खरी शिवसेना म्हणणाऱ्यांनी स्वतःला आरशात पाहावं', संजय राऊतांचा टोला

Shivsena Vardhapan Din: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी 1९ जून १९६६ मध्ये शिवसेना पक्षाची स्थापना केली. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर पक्षात दोन गट पडले अन् दोन वर्धापनदिन होऊ लागले. यावरुनच संजय राऊत यांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे.

Gangappa Pujari

मयुर राणे, ता. १८ जून २०२४

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेना पक्षाचा उद्या वर्धापनदिन. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना पक्षात दोन गट पडल्याने यंदाही दोन वर्धापनदिन साजरे केले जाणार आहेत. यावरुनच आता शिवसेना शिंदे गट अन् ठाकरे गटामध्ये टीका- टिप्पणी सुरू झाली असून स्वतःला खरी शिवसेना समजणाऱ्यांनी एकदा आरशात पाहावं, असे म्हणत संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

"उद्या शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 58 वर्षांपूर्वी शिवसेनेचा पाया घातला. 58 वर्षांपासून बाळासाहेबांची शिवसेना मुंबई, महाराष्ट्र, दिल्लीत काम करतेय. आम्ही तेव्हापासून त्यांच्या विचारांनी भारावलेले सर्व तरुण, तेव्हापासून बाळासाहेबांच्या विचारांनी भारावून आम्ही भगवा झेंडा आमच्या खांद्यावर घेतला. आम्ही सर्वांनी तुरुंगवास भोगला पण आम्ही आमच्या पक्षाशी इमान कायम ठेवला," असे राऊत म्हणाले.

"आता जर कोणी म्हणत असेल ते शिंदे गट आमची शिवसेना खरी तर त्यांनी स्वतःला आरशात पहावं. बाळासाहेबांनी शिवसेना जेव्हा स्थापन झाली तेव्हा ते कुठे होते? डोम नावाच्या सभागृहात कुठेतरी हे दोन कावळे उद्या जमणार आहेत. आपला पक्ष आहे तो महाराष्ट्राशी दुश्मनी करणाऱ्या मोदी शहांशी चरणाशी ठेवणं याला जनाधार आणि विचारधारा म्हणत नाही," असा खणखणीत टोला संजय राऊत यांनी लगावला.

"जिथे ठाकरे तिथे शिवसेना. हे शिंदे मधेच कुठून उगवले? यांना भाजपने आणलं, हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. राज्यात पैशाच्या ताकदीवर पाच सहा जागा जिंकल्या म्हणजे विचारधारा आणि शिवसेना त्यांची होत नाही. असंख्य काँग्रेस पक्ष स्थापन झाले मूळ काँग्रेस पक्ष आजही आहे आणि तोच सर्वात मोठा पक्ष आहे," असेही संजय राऊत यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Train Cancelled : प्रवाशांसाठी मोठी बातमी! साईनगर शिर्डी एक्सप्रेससह ८ रेल्वे आज रद्द, नेमकं कारण काय? वाचा

Maharashtra News Live Update: राज्यात मुसळधार, पण बुलडाण्यात पावसाची दडी

Kidney disease: किडनी खराब होण्याआधी शरीर देतं हे ५ धोकादायक इशारे; क्रिएटिनिन वाढण्याचं खरं कारण जाणून घ्या

Early cancer symptoms: तिसऱ्या आणि चौथ्या स्टेजमध्येच का होतं कॅन्सरचं निदान? डॉक्टरांनी सांगितलं यामागचं कारण

सकाळी नाश्त्याला प्या गरमा गरम गाजर-मशरूम सूप; झटपट बनवा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT