Police Constable Hit By Train Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Police: हेडफोन्सनी घेतला जीव! रेल्वेच्या धडकेत पोलिस कॉन्स्टेबलचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Mumbai Police Constable Hit By Train: मुंबईमध्ये हेडफोन्स लावून रेल्वे रुळावरून चालणे एका पोलिस कॉन्स्टेबलच्या जीवावर बेतले. लोकलच्या धडकेत या पोलिस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला. रवींद्र हाटे (२८ वर्षे) असे या पोलिस कॉन्स्टेबलचे नाव आहे.

Priya More

प्रवासादरम्यान कानामध्ये हेडफोन्स लावून गाणी ऐकायला प्रत्येकालाच आवडते. पण याच हेडफोन्समुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना आतापर्यंत आपण पाहिल्या आहेत. हेडफोन्स लावून वाहन चालवताना अपघात, रस्ता ओलांडताना अपघात, रेल्वेच्या धडकेत मृत्यू अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. असे असताना देखील अनेकांच्या सवयी काही बदलत नाहीयेत. अशामध्ये मुंबईमध्ये हेडफोन्स लावून रेल्वे रुळावरून चालणे एका पोलिस कॉन्स्टेबलच्या जीवावर बेतले. लोकलच्या धडकेत या पोलिस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र हाटे (२८ वर्षे) असे या पोलिस कॉन्स्टेबलचे नाव आहे. रवींद्र हाटे यांचा लोकलच्या धडकेमध्ये मृत्यू झाला. कानाला हेडफोन्स लावून रवींद्र हाटे रेल्वे रुळावरून चालले होते. विक्रोळी ते कांजूरमार्ग रेल्वे स्थानकादरम्यान त्यांना लोकलने धडक दिली. या अपघातामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. कुर्ला रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी यादव यांनी ही माहिती दिली.

विक्रोळी ते कांजूरमार्ग रेल्वे स्थानकादरम्यान कानामध्ये हेडफोन्स लावून रवींद्र हाटे रेल्वे रुळावरून चालले होते. त्याचवेळी टॉवर वॅगन ही लोकल त्याठिकाणावरून धावत होती. मेगाब्लॉकदरम्यान या लोकलचा वापर केला जातो. रविवारी मेगाब्लॉक असल्यामुळे ही लोकल फेऱ्या मारत होती. त्याचवेळी विक्रोळी-कांजूरमार्ग रेल्वे स्थानकादरम्यान रवींद्र हाटे हे कानात हेडफोन्स लावून रेल्वे रुळावरून चालत होते. मोटरमनने हॉर्न दिला पण कानामध्ये हेडफोन्स असल्यामुळे रवींद्र हाटे यांना आवाज ऐकू आला नाही. अशातच त्यांना लोकलची जोरदार धडक बसली. या अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

रवींद्र हाटे हे नाईट शिफ्ट संपवून रेंटवर रूम पाहण्यासाठी कांजूर मार्ग येथे आपल्या मित्राच्या घरी जात होते. त्यांनी ब्रीजवरून न जाता शॉर्टकटने रेल्वे रुळावरून जाण्याचा प्रयत्न केला. पण याच प्रयत्नात त्यांचा जीव गेला. ते लोकल आर्मस १ मध्ये काम करत होते. रेल्वे अपघातामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ उपचारासाठी घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.

दरम्यान, पोलिस कॉन्स्टेबल रवींद्र हाटे पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातील मदनवाडी येथील रहिवासी होते. त्यांचे वडील शेतकरी आहेत. दीड वर्षांपूर्वी रवींद्र हाटे यांचे लग्न झाले होते. त्यांना काही महिन्यांपूर्वीच मुलगा झाला होता. रवींद्र हाटे यांच्या भावाला देखील नुकताच पोलिसामध्ये नोकरी मिळाली होती. तो सध्या जालना येथे ट्रेनिंग घेत आहे. रवींद्र हाटे यांच्या अपघाती मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT