mumbai local train
mumbai local train  saam tv
मुंबई/पुणे

Mumbai News : कळव्यात धावत्या लोकलवर पुन्हा दगडफेक; प्रवाशाला गंभीर दुखापत

साम टिव्ही ब्युरो

Mumbai News : श्वास रोखणारी गर्दी, लोकल विलंब, रुळाला तडे अशा अनेक अडचणींचा सामना करत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता जीवघेण्या दगडफेकीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मुंबईच्या (Mumbai) कळव्यात सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकलवर काही समाजकंटकांनी दगडफेक केली. या दगडफेकीत प्रवाशाला गंभीर दुखापत झाली आहे.

कळवा रेल्वे स्थानकापूर्वी असलेल्या रेल्वे पुलाच्या दरम्यान फलाट क्रमांक १ वरुन कल्याण दिशेने जाणाऱ्या लोकलवर (Local Train) काही टारगट समाजकंटकानी दगडफेक केली. या दगडफेकीत कळवा येथे उतरण्यासाठी दरवाज्यात उभे असणाऱ्या एका प्रवाशाच्या नाकाला गंभीर दुखापत झाली.

बालचंद गुप्ता (वय 35, राहणार पूर्व शांतीनगर) असं दुखापतग्रस्त व्यक्तीचं नाव आहे. दगडफेक करताच, समाजकंटकांनी पळ काढला. जखमी झालेल्या गुप्ता यांना तातडीने रेल्वे पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं. त्यांच्या नाकाला मार लागला आहे.

दरम्यान, गुप्ता यांना छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे. त्यांच्या नाकाला गंभीर दुखापत झाली असून नाकातून मोठा रक्तस्त्राव होत आहे. सध्या डॉक्टरांच्या सल्यानुसार त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

अशाप्रकारे दगडफेकीच्या घटना दहा बारा वर्षापूर्वी ठाणे व कळवा दरम्यान जलदगती मार्गावर मोठ्या प्रमाणात घडत होत्या. तेव्हा सुद्धा बऱ्याच प्रवाशांना गंभीर दुखापती झाल्या होत्या. आता पुन्हा दगडफेकीच्या घटना सुरू झाल्याने या समाजकंटाकांचा बंदोबस्त करा, अशी मागणी केली जात आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report | ..तर पक्ष फुटला असता! शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Csk vs Rcb: आरसीबीचं सेलिब्रेशन माहीला पाहावे ना? हस्तांदोलन न करताच परतला धोनी

INDIA आघाडी 300 जागा जिंकलीय, पाचव्या टप्प्याच्या मतदानाआधीच तेजस्वी यादव यांचा मोठा दावा

Today's Marathi News Live: पुण्यात बर्निंग बसचा थरार; आगीमुळे मोठी वाहतूक कोंडी

Eknath Shinde News |मुख्यमंत्र्यांनी लुटला क्रिकेट खेळण्याचा आनंद!

SCROLL FOR NEXT