Nitin Gadkari Saam Tv
मुंबई/पुणे

Nitin Gadkari News: 'सत्य मांडण्याची पत्रकारांना किंमत मोजावी लागते..' केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केली खंत

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात मराठी पत्रकार परिषदेचा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.

Gangappa Pujari

सुरज मासुरकर, प्रतिनिधी...

Nitin Gadkari News: मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ जोशी यांना जाहीर झाला. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज हा पुरस्कार दिला गेला. यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी पत्रकारांच्या अडचणी आणि विविध मुद्द्यांवर भाष्य केले. (Nitin Gadkari Mumbai News)

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात मराठी पत्रकार परिषदेचा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी ९ दिग्गजांचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते सन्मान केला गेला. यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी विविध विषयांवर प्रखड भाष्य केले.

काय म्हणाले नितीन गडकरी...

"भविष्याचा संबध ज्ञानाशी आहे आणि त्याचा संबध हा कम्युनिकेशनशी आहे. असे म्हणत हजारो लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण पत्रकार करु शकतात. मात्र सत्य मांडण्याची किंमत या पत्रकारांना मोजावी लागते आणि महाराष्ट्रात अश्या पत्रकारांचा असा इतिहास आहे," असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

तसेच यावेळी पुढे बोलताना "पत्रकारांना नाव मिळते पण त्या प्रमाणात पैसे मिळत नाहीत. जेवढी स्टेबिलिटी पत्रकारांना मिळायला पाहिजे ती मिळत नाही.. असे म्हणत जो पर्यंत काम चालू तो पर्यंत नाव आणि पैसे मिळतात काम थांबल्यावर काही मिळत नाही. पण मी नक्कीच यावर विचार करेन..." असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

दैनिक सकाळच्या पत्रकाराचा गौरव...

दरम्यान, या कार्यक्रमात दैनिक सकाळचे (Skal) पत्रकार मारुती कंदले यांचाही गौरव करण्यात आला. मारुती कंदिले यांना प्रमोद भागवत शोध पत्रकारिता पुरस्कार देवून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LSG vs KKR: सुपर ओव्हरमध्ये कोलकाताचा शानदार विजय; रिंकू सिंहने पालटलं संघाचं नशीब, लखनौचा सलग पाचवा पराभव

PM Kisan Scheme: शेतकऱ्यांना मिळणार ९ हजार रुपये; PM किसानचा हप्ता वाढणार,पंतप्रधान मोदींची घोषणा

MSRTC: एसटी महामंडळात कोट्यवधींचा 'ग्रॅज्युटी घोटाळा'? ६३ बड्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

Maharashtra News Live Update: वनरक्षकावर हल्ला केल्यानंतर तासाभरात वाघिणीचा मृत्यू

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना सरकारचा दणका; बोगस लाभार्थ्यांकडून 11 कोटींची वसुली

SCROLL FOR NEXT