mumbai news Man falls into 25 foot deep manhole in Sakinaka  Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai News: मुंबईत मोठी दुर्घटना! साकीनाक्यात २५ फूट खोल मॅनहोलमध्ये माणूस पडला; शोधमोहीम सुरू

Man Falls into manhole in Sakinaka: मुंबईतील साकीनाका परिसरात २० ते २५ फूट खोल मॅनहोलमध्ये अज्ञात व्यक्ती पडल्याची घटना घडली. अग्निशामक दल व पोलिसांकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू असून सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

Shruti Vilas Kadam

Mumbai News: मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी तुंबल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशातच साकीनाका परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील २० ते २५ फूट खोल मॅनहोलमध्ये एक अज्ञात व्यक्ती पडल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली असून, त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशामक दल, पोलीस आणि संबंधित यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर बचाव आणि शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. पण अद्याप बचावात काही प्रगती दिसून येत नसल्याने स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आमदार दिलीप लांडे यांनी माध्यमांशी बोलताना त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच गांधी मार्केट परिसरात महापौर रितू तावडे पाहणीसाठी उपस्थित असताना त्यांच्या समोरच पालिकेचा एक कर्मचारी मॅनहोलमध्ये पडल्याची घटना घडली होती. ती घटना ताजी असतानाच साकीनाक्यात पुन्हा अशी दुर्घटना घडल्याने पालिकेच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

चांदीवलीमध्ये उघड्या गटारात माणूस पडला आणि वाहून गेला!

प्रभाकर मार्ग १५८, एस.जे. स्टुडिओसमोर, खैरानी रोड येथे उघड्या मॅनहोलमध्ये एक व्यक्ती पडून वाहून गेली असून अद्याप त्यांचा कोणताही शोध लागलेला नाही. ही घटना अत्यंत गंभीर असून ही थेट एल वॉर्ड प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराच्या निष्काळजीपणाचे परिणाम आहेत. चांदीवलीमध्ये अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे. तरीही प्रशासनाने कोणताही धडा घेतलेला दिसत नाही. या प्रकरणातील संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aleovera Benefits : तुमचेही केस तेलकट अन् चिकट होतात का? 'हा' घरगुती उपाय करून मिळवा सिल्की केस

CJP Protest: दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ दादरमध्ये आंदोलन, आदित्य आणि अमित ठाकरेंनी घेतली आंदोलकांची भेट| VIDEO

Poladpur Tourism : कोकणातील हे लपलेलं निसर्गरत्न! पावसाळ्यात पुन्हा सजला मोरझोत धबधबा

Drink Water : दररोज सकाळी २ ग्लास पाणी का प्यावं? वाचा चमत्कारिक फायदे

Devgad Waterfall : पाऊस, कोकण अन् धो धो कोसळणारा धबधबा, देवगडजवळ लपलंय 'हे' सुंदर ठिकाण

SCROLL FOR NEXT